In Sangali & Satra District
River Length: 125 Km
Origin Location: Yerla River originates from Solknath Hill in the north of Khatav Taluka of Satara District.
Confluence Location: Bramhanal, Sangli, Maharashtra
Name and Contact of The Coordinator:
Sundargiri Maharaj 9421179399
Prakash Jadhav 9145707134
Sampatrao Pawar 9657737537
Dr. Jay Kulkarni 9552589751
येरळा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे.
येरळा नदीची लांबी 125 किमी आहे.
महाराष्टात येरळा नदीचे खोरे सातारा आणी सांगली जिल्ह्यात आहे.
येरळा नदीचे खोऱे हे के.आर– 9, के.आर– 10, के.आर– 11, के.आर– 23, के.आर– 24, के.आर– 25, या पानलोटक्षेत्रात आहेत.
नांदणी नदी, कर्पुर नदी, चॉन्द नदी, या तीनही येरळा नदीची प्रमुख उप नदी आहेत.
येरळा नदी खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ ३०४१ चौ .कि.मी. आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव व कराड तसेच सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, पलूस, तासगाव या तालुक्यामध्ये नदीचे खोरे पसरलेले आहे.
येरळा नदीचा संगम कृष्णा नदीस सांगली जिल्ह्यातील ब्रम्हणाळ येथे होतो.
या नदीवर वडूज, मायणी व भाकूची वाडी येथे जलसिंचन प्रकल्प आहेत.
येरळा नदीचा इतिहास:-
येरळा ही नदी प्रचीन काळी वेदावती या नावाने ओळखली जाई. या नदीच्या तीरावर बसीन ऋषि वेद पठण करीत. या नदीवर नेर आणि येरळवडी ही दोन लहान ब्रिटिशकालीन धरणे आहेत. येरळा नदी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी तालुके खटाव, खानापूर, तासगाव तालुक्यांतील लोकांची जीवनदायिनी आहे. येरळा नदी ही सहामाही वाहिनी असून इतर सहा महिने नदीचे पात्र कोरडे असते. इ.स. १९८० सालापासून या खोऱ्यातील अत्यल्प पावसामुळे या नदीच्या खोऱ्यातील लोक भीषण दुष्काळाचा सामना करत आहेत. येरळा नदीचे खोरे आणि माण नदीचे खोरे पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी मराठवाडा समजले जाते. माण आणि येरळा या नद्यास नदी जोड प्रकल्प अतिआवश्यक आहेत. या नदीला जर पुनरुज्जीवित करायचे असेल आणि बारा महिने वाहती ठेवायचे असेल तर नदी जोड प्रकल्पाची, तसेच नदीच्या पात्रातील वाळू उपसा थांबवण्याची गरज आहे.
येरळा नदीच्या किनारी खटाव तालुक्यात नागनाथवाडी येथे पुरातन शिवमंदिर आहे. याच येरळा नदीच्या किनारी पुसेगावचे श्री सेवागिरी महाराज यांचे मंदिर आहे. खटाव येथील प्रसिद्ध हेमाडपंती पिंपळेश्वर मंदिर व पांडवकालीन मंदिर ही येरळा नदी काठी आहेत.
पाणलोट क्षेत्र नकाशे
येरळा नदी खोरे नकाशा
Elevation Map Yerla Basin
Groundwater Potential Map of Yerla Basin, Dist - Satara
LAND USE / LAND COVER MAP of YERLA BASIN
Map Showing Prioritization for Artificial Recharge
VILLAGE MAP of YERLA BASIN, Dist- SATARA.
सातारा जिल्हा टोपोशीट
येरळा नीदी टोपोशीट जिल्हा सातारा
जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रापैकी १३% क्षेत्र वनांखाली, ६.९९% चराऊ कुरणांखाली, २.६१% बिगर शेतीसाठी, ४% क्षेत्र लागवडीलायक, मात्र पडीक जमिनीचे आहे. जिल्ह्यातील सुमारे ५७% खातेदार एक हेक्टरपेक्षा कमी जमिनीचे क्षेत्र असणारे होते (१९९८-९९). सातारा जिल्हा कृषिप्रधान असून येथे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांतील पिके घेतली जातात. बाजरी, तांदूळ, भुईमूग, घेवडा ही जिल्ह्यातील प्रमुख खरीप पिके असून, गहू व हरभरा ही रब्बी पिके आहेत. ज्वारीचे पीक दोन्ही हंगामांत घेतले जाते. कराड, खटाव, सातारा व पाटण या तालुक्यांत खरीप संकरित ज्वारीचे, तर फलटण, सातारा, वाई, कोरेगाव व खंडाळा या तालुक्यांत रब्बी ज्वारीचे पीक अधिक प्रमाणात घेतले जाते. पाटण, कराड, जावळी, महाबळेश्वर हे तालुके तांदळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्घ आहेत. माण, खटाव, खंडाळा, फलटण व कोरेगाव तालुक्यांतील कमी पावसाच्या पदेशांत बाजरीचे पीक घेतले जाते. फलटण, खटाव व जावळी हे तालुके गव्हाच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहेत. सातारा, कराड, पाटण, जावळी, वाई व कोरेगाव या तालुक्यांमध्ये भुईमूग अधिक प्रमाणात पिकविला जातो. हरभऱ्याचे उत्पादन सर्वच तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात घेतले जाते. फलटण तालुक्यात द्राक्षे व डाळिंबाच्या बागा आहेत. कराड तालुक्यात थोड्या फार प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. कोरेगाव व खटाव हे तालुके बटाट्याच्या आणि माण, फलटण व खंडाळा हे तालुके कांद्याच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहेत. कृष्णाकाठची वांगी प्रसिद्घ आहेत. ऊस हे प्रमुख नगदी पीक आहे. हळद, आले ही पिकेही येथे घेतली जातात. पाचगणी, महाबळेश्वर व वाईचा परिसर स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी विख्यात आहे. खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्र (स्थापना १९३२), महाबळेश्वर येथील गहू गेरवा संशोधन केंद्र (१९४०), कराड येथील एकदल व गळितांच्या पिकांच्या जातीवर संशोधन करणारे केंद्र (१९४८), रहिमतपूर येथील आले संशोधन केंद्र ही जिल्ह्यातील प्रमुख कृषिशिक्षण व संशोधन केंद्रे आहेत.
15 Jan 2025
15 Jan 2025
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
Our team is here to provide the guidance and resources you need. Together, we can achieve meaningful results.
Contact UsPune
The Indrayani River, originating near Lonavala in Maharashtra, holds significant religious and ecological importance. However, it faces severe pollution due to untreated domestic sewage, industrial effluents, and religious activities in towns like Alandi and Talegaon.
pune
The Bhima River, a major tributary of the Krishna River, faces significant pollution due to untreated industrial effluents, agricultural runoff, and domestic sewage. Rapid urbanization and industrialization along its banks have further exacerbated the problem, particularly in the Pune and Solapur districts.
Nashik
The Godavari River is facing water scarcity due to over-extraction for agriculture, industrial use, and growing urban demand. Large-scale irrigation projects, unregulated borewell drilling, and inefficient water management exacerbate the issue.