Waldevi

In Nashik District

River Length: 30 Km


 Origin Location: Anjneri Parvat, Dist - Nashik


 Confluence Location: Darna River Chehedi, Dist - Nashik

 

 Name and Contact of The Coordinator: 

Uday Thorat  7020915643 

Sunil Mendhekar  

Introduction of River

वालदेवी नदी ही दारणा नदीची सर्वात महत्वाची उपनदी आहे.

वालदेवी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर तालुक्यात सह्याद्री पर्वत रांगातील अंजनेरी पर्वत येथे होतो.

या नदीची लांबी 30 कि.मी. आहे.

वालदेवी नदी खोरे GV-10 या पाणलोटात आहे.

वालदेवी नदीचा संगम नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर तालुक्यातील देवळालीगाव व चेहेडी येथे दारणा नदीला संगम होतो.


वालदेवी नदीचा इतिहास:-

  त्र्यंबकेश्वर तालुक्यात सह्याद्री पर्वत रांगातील अंजनेरी पर्वत येथे उगम पावते व नाशिक तालुका,चेहेडी येथे दारणा नदीला संगम करते. साधारण संपूर्ण लांबी ३० कि.मी. पर्यंत आहे. अंजनेरी पर्वत हा पूर्णता वनविभागाच्या हद्दीत आहे. अंजनेरी पर्वत हा महाबली हनुमान यांचे जन्मस्थळ म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. तसेच अंजनेरी पर्वत हे दुर्मिळ गिधाडांचे, गरुड, घार या पक्ष्यांचे अभयारण्यआहे. त्याचप्रमाणे मकडांचे मोठे वास्तव्य येथेप्रसिद्ध आहे. अंजनेरी पर्वत हा पर्वत भ्रमंती करण्यासाठी एक प्रसिद्ध स्थळ आहे.


नदी काठाची गावे :-

अंजनेरी पर्वत, मुळेगाव, दाहेगाव, पिंपळद, राजुर बहुला, आंबे बहुला, गौळणे, पाथर्डी शिवार, दाढेगाव, वडनेर दुमाला, विहितगाव, देवळालीगाव व चेहेडी

River Basin Villages and Related Maps

पाणलोट क्षेत्र नकाशे:- GV-10 


वालदेवी नदी खोऱ्यातील तालुके यांचे नकाशे:-

त्र्यंबकेश्वर तालुका


वालदेवी नदीचे टोपोशीट




Drinking Water Issues in River Basin

वालदेवी नदीचे यात्रा करत असताना गावातील लोकांसोबत चर्चा केली असता एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला, ग्रामपंचायतच्या माध्यमातून नळाद्वारे सोडण्यात येणारे पाणी ८० टक्के लोक पिण्यासाठी वापरत नाहीत. गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी बर्याच ग्रामपंचायतीने नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे या उद्देशाने आरो प्लांट (वॉटर एटीएम) ग्रामपंचायत च्या बाहेर उभारले होते. या मध्ये पाच रुपयाला वीस लिटर पाणी नागरिकांना मिळत होते. परंतु त्याची देखभाल दुरुस्ती न केल्याने ते सर्व आरो प्लांट नादुरुस्त आहेत.

   गावांमध्ये खाजगी आरो प्लांट मोठ्या प्रमाणात बसवण्यात आले असून, नागरिकांना वीस रुपयाला वीस लिटर पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. एका कुटुंबाला दररोज जवळपास 40 लिटर पाणी विकत घ्यावे लागते ज्याचा त्यांना प्रत्येक दिवशी 40रुपये खर्च करावा लागत आहे. नंदिनी(नासर्डी) नदी खोऱ्यातील गावांमध्ये आज-काल दुधा पेक्षाही पाण्यावर जास्त खर्च केला जात असल्याचे लोकांच्या बोलण्यातून समोर आले आहे.

Pollution of River and Streams

वालदेवी नदीत सुंदरनगर, रोकडोबावाडी, वडावरवाडी, अण्णा भाऊ साठेनगर, राजवाडा, फुलेनगर येथून नदीत सांडपाण्याच्या गटारी सोडलेल्या आहेत. लष्करी भागातील सांडपाणीही सोडले जाते. गंभीर बाब म्हणजे वाल्मीकनगरच्या सुलभ शौचालयाचा मैलाही नदीत सोडण्यात येत आहे. नदीकाठी राजवाडा, गुलाबवाडी, खर्जुल मळा, रोकडोबावाडी, गायकवाड मळा, चेहेडी परिसर येतो. नदीतील घाण पाण्यात डुकरे सदैव डुंबत असतात. डासांचा आणि साथीच्या आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. नदीतील अशा पाण्यावरच वीटभट्टी, शेतीही करावी लागत आहे.

वालदेवी नदी चेहेडीच्या पुढे दारणा नदीला मिळते. दारणात वालदेवीच्या पाण्याएेवजी मैला, गटारीचे पाणी यांचा अजब संगम होतो. हेच पाणी नाशिकरोडकरांसाठी टंचाईकाळात उचलले जाते. या पाण्यामुळेच नाशिकरोडकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. नदीत कचरा, घाण टाकल्यास पाच हजार रुपये दंड केला जाईल, असा फलक लावण्यात आलेला आहे. मात्र, राजरोसपणे कचरा टाकून वालदेवीची गटारगंगा केली जात असतानाही आजपर्यंत दंड झालेला नाही.

या उपाययोजनांची गरज


  वालदेवीत मलजल व गटार सोडणाऱ्या लष्करी हद्दीत त्यांच्या मालकीचा एसटीपी प्लँट बांधून पाणी फिल्टर करून नदीत सोडण्यास सांगावे. सुंदरनगर व रोकडोबावाडीतील मुख्य नाला वालदेवीत न सोडता तातडीने भुयारी गटारीत सोडावा. वालदेवीच्या एका बाजूने जॉगिंग ट्रॅक तयार करावा व नदीकाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे. बागूलनगर येथे नदीत सोडलेला नाला त्वरित बंद करावा. स्मार्ट सिटी प्रकल्पात वालदेवीचा समावेश करावा. गणेश विसर्जन ठिकाण, महादेव मंदिर, विहितगाव दशक्रिया विधी शेड, वडनेररोड, आर्टिलरी आदी ठिकाणी घाट बांधावेत

Encroachment on River Lands

वालदेवी नदीच्या प्रत्यक्ष यात्रे दरम्यान नंदिनी(नासर्डी) नदीचे पात्र हे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्याचे दिसून आले. नंदिनी(नासर्डी) नदी पात्रात प्रमुख तीन प्रकारचे अतिक्रमन दिसून आले.

1.     विहिरींचे अतिक्रमण:-

2.     शेतीचे अतिक्रमण:-

3.     बांधकामाचे अतिक्रमण:-  

1.   विहिरींचे अतिक्रमण:-

         नदीच्या काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांनी नदीपात्रात विहीर घेऊन त्या विहिरीला सिमेंट काँक्रीटचे कडे तयार केले असून त्या विहिरीतून निघालेला सर्व दगड, गाळ, माती हा राडाराडा नदीच्या पात्रातच टाकलेला आहे. त्यामुळे नदीची वाहन क्षमता खूपच कमी झाल्याचे दिसून आले. नदीपात्रात जवळपास 100 मीटर वरती एक विहीर असा भाग अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला आहे. आजूबाजूच्या व गावातील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली असता लोकांनी शेतकऱ्यांनी नदीच्या काठावर किंवा पात्रामध्ये विहिरी घेतल्या असेल तर विहिरी असू द्याव्यात परंतु विहिरीतून निघालेला गाळ, माती, कचरा इत्यादी राडाराडा शेतकऱ्याने तात्काळ बाजूला करावा आसे मत मांडले.


2.   शेतीचे अतिक्रमण:-

    नंदिनी(नासर्डी) नदीची यात्रा करत असताना प्रामुख्याने नदीपात्रात शेत जमिनीचे अतिक्रमण झाल्याचे आढळले. कारण काय तर ही नदी बारमाही वाहत नसल्याने ज्यावेळेस नदीपात्रात पाणी नसते त्यावेळेस शेतकरी आपला बांध नदीपात्रात सरकवतात आणि डायरेक्ट पीक नदीपात्रात घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्याचा वैयक्तिक फायदा होतो आहे. परंतु नदीची पाणी वाहन क्षमता व पाणी साठवण क्षमता कमी झाल्याचे दिसून आले.


3.   बांधकामांचे अतिक्रमण:-

   नदीच्या काठावर असणाऱ्या प्रत्येक गावातील स्मशानभूमी नदीपात्रात असल्याचे आढळले.  स्मशानभूमी नदीपात्रात आहेच सोबतच लोकांना तेथे उभे राहता यावे यासाठी नदीपत्रांमध्ये भराव टाकून काही ठिकाणी काँक्रीट तर काही ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवल्याचे दिसून आले. काही गावात नदीच्या पत्रामध्ये मंदिर व सार्वजनिक शौचालय असल्याचेही दिसून आले.

Forests of River Basin

नाशिक जिल्ह्यातील एकूण क्षेत्रफळापैकी 22.13% भागावर वन प्रदेश असून त्याचे क्षेत्रफळ 3,446.28 चौरस किमी. आहे. त्यापैकी 2,920.07 चौरस किमी. जंगले राखीव आहेत व 245.45 चौरस किमी जमला संरक्षित आहेत. या भागात पाऊस भरपूर व प्रदेश दुर्गम असल्यामुळे लोकसंख्या खूप कमी आहे.       

    त्यामुळे जंगले अधिक प्रमाणात वाढली आहेत व टिकून आहेत. साग ही प्रमुख महत्त्वाची वनस्पती असून सालई, ऐन, बांबू, हळदू, कळंब, शिसवी, खैर, तिवस, हिरडा, बाभूळ, बिबळा, धावडा, आंबा, जांभूळ, मोहवा ह्या महत्त्वाच्या अन्य वनस्पती आहेत. सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील भागात साद, सादडा, काकड, सालई, मोदल, ह्या प्रमुख वनस्पती आहेत.

  पूर्वेकडील जास्त वस्तीच्या प्रदेशात खुरटी झुडुपे, काटेरी झाडे असून सालई, धावडा आणि बाभूळ ही इंधनोपयोगी महत्त्वाची झाडे आहेत. काही भागांत अंजन, खैर व तुरळक ठिकाणी चंदनाचीही झाडे आहेत. रोशा गवत, हिरडे व विडीची पाने ही महत्त्वाची अन्य उत्पादने आहेत.

   नाशिक या जिल्ह्यातील जंगलात वाघ, चित्ता, रानडुक्कर, अस्वल, सांबर यांसारखे हिंस्त्र प्राणी, तसेच नीलगाय, चितळ, भेकर इ. प्राणी 1880 पूर्वी विपुल होते

पण जंगले विरळ झाल्याने व बेबंद शिकारीमुळे आज बिबळ्या, लांडगा, खोकड, तरस, सांबर, माकड, मुंगूस, धार्डिया (भुंकणारे हरिण), रानडुक्कर, कोल्हा हेच प्राणी मुख्यतः आढळतात. काळवीट, चिंकारा, चौशिंगा व नीलगाय हे क्वचित आढळतात.

River Basin Agricultural Practices and Allied Business

   नाशिकमध्ये कांदा, द्राक्ष, डाळिंब, बाजरी, ज्वारी, हरभरा, मका, गहू, ऊस, पेरू, कापूस, भात, नाचणी, वरई, मूग, मठ, कुळीद, उडीद, तूर, फूलशेती याशिवाय भाजीपालाही मोठ्या प्रमाणात घेतला जातो. कांदा, द्राक्ष व टोमॅटो निर्यातही केले जाते.

  जिल्ह्यात मालेगाव व येवले ही हातमाग कापडउद्योग केंद्रे असून तेथे सुती आणि रेशमी कापड, लुगडी, जरीच्या पैठण्या, पितांबर इ. विणले जातात.

  ओझरजवळच किर्लोस्कर कंपनीचा ट्रॅक्टरचा कारखाना आहे. पिंपळगाव बसवंतजवळ द्राक्षापासून ‘पिबोला’पेये बनविण्याचा कारखाना आहे. विड्या वळण्याचा कुटीरोद्योगही महत्त्वाचा असून त्यात सु.7,000 लोकांस रोजगार मिळत असे.

Biodiversity of the River Basin

हि जैवविविधता कुळांनुसार विभागली जाते-


1) मासे:- या मध्ये काटला, रोहू, नकटा, म्रीगल, बास, शींधी, कुरळ, अश्या साधारण 19 प्रजाती आढळून येतात.

2) उभयचर:- 11 प्रजातींचे उभयचर म्हणजे बेडूक प्रजाती येथे आढळून येतात.

3) सरपटणारे प्राणी:- या मध्ये सर्प प्रजाती जसे नाग, घोणस, मण्यार, फुरसे, धामण, कवड्या, रुका सर्प, नानेटी, पानदिवड , कासव या प्रजातीचा वावर सुद्धा दिसून आला आहे.

4) पक्षी:- वालदेवी नदी खोर्यातील स्थानिक आणि स्थलांतरीत अश्या विविध पक्ष्यांच्या 190 पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. या मध्ये ब्राम्हणी घार, छोटा बगळा, बुलबुल, मोर यांसारख्या सामान्य पक्षी प्रजातींनसोबत तुतवार, हिरवी तुतारी, धाविक, वन घुबड, जांभळा बगळा, निलपरी, निळा माशिमार, रंगीत पानलावा, तीरचिमनी, अशा दुर्मिळ आणि काही स्थलांतरित पक्षी प्रजाती आढळून येतात. कवठेमहांकाळ तालुक्यातील नंगोळे गावात 4 वर्ष माळढोक पक्षी वास्तवास होता.

5) सस्तन प्राणी:-सस्तन प्राण्यांच्या एकूण 23 प्रजाती आढळून येतात. या मध्ये दुर्मिळ असलेल्या भारतीय लांडगा, खोकड, खवल्या मांजर, 5 पाट्यांची खार, मांज्याट यांसारख्या वन्य प्राण्या सोबत शेळ्या, मेंढ्या, म्हशी, गायी, यांच्या काही प्रजाती आढळून येतात.

कीटक, भुंगे, फुलपाखरे, मुंग्या, पतंग, माश्या, मधमाशी, यांसारख्या कीटकांच्या आणि कोळी, विंचू, खेकडे, गोचीड यांसारख्या अष्टपाद जीवांच्या कित्तेक प्रजाती आढळून येतत.

Newspaper and Social Media Coverage






blog

Pune

Pollution in Indrayani River

The Indrayani River, originating near Lonavala in Maharashtra, holds significant religious and ecological importance. However, it faces severe pollution due to untreated domestic sewage, industrial effluents, and religious activities in towns like Alandi and Talegaon.

blog

pune

Pollution in Bhima River

The Bhima River, a major tributary of the Krishna River, faces significant pollution due to untreated industrial effluents, agricultural runoff, and domestic sewage. Rapid urbanization and industrialization along its banks have further exacerbated the problem, particularly in the Pune and Solapur districts.

blog

Nashik

Water Scarcity and Over-Extraction

The Godavari River is facing water scarcity due to over-extraction for agriculture, industrial use, and growing urban demand. Large-scale irrigation projects, unregulated borewell drilling, and inefficient water management exacerbate the issue.

© 2025, Jal Biradari