In Nashik & Palghar District
River Length: 171 Km
Origin Location: Trambakeswar Nashik
Confluence Location: Wada, Dist - Palghar
Name and Contact of The Coordinator:
Rahul Tiwarekar 9082163635
वैतरणा नदी ही कोकणातील प्रथम क्रमांकाची लांब नदी आहे.
वैतरणा नदीचा उगम त्र्यंबकेश्वर तालुक्यात सह्याद्री सह्याद्रीच्या त्रिंबक-अंजनेरी डोंगररांगेच्या दक्षिण उतारावर उगम पावते.
वैतरणा नदीचे तीन मुख्य शीर्षप्रवाह असून ते नासिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील दापूरे गावाच्या उत्तरेस एकत्र येतात व तेथपासून वैतरणा नदीचा प्रवाह ठाणे व नासिक जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील थळघाटापर्यंत दक्षिणेस वाहत जातो.
या नदीची लांबी 154 कि.मी. आहे. वैतरणा नदीचे खोरे नाशिक आणि ठाणे जिल्ह्यात आहे.
वैतरणा नदी खोरे WF-1, WF-2, WF-24, WF-21 या पाणलोटात आहे.
वैतरणा नदीच्या तानसा, पिंजाळ , देहरजा , सूर्या या प्रमुख उप नद्या नद्या आहेत.
वैतरणा नदी अरबी समुद्राला दातिवरे खाडीतून मिळते.
. वैतरणा नदीचा इतिहास:-
प्राचीन काळापासून या नदीला गोदावरी नदीप्रमाणे धार्मिक महत्त्व असल्याचे उल्लेख आढळतात. दख्खनच्या पूर्व व मध्य भागातील एक व्यापारी मार्ग म्हणून हिचे खोरे प्रसिद्ध असून याच्या दक्षिण भागातील सुपीक प्रदेश व निसर्गसौंदर्य यांमुळे आर्यांनी येथे वसाहती केल्याचे उल्लेख आढळतात.
एक पवित्र नदी म्हणून हिचा महाभारतात उल्लेख आढळतो. गोदावरी व वैतरणा ही एकच नदी आहे, असा टॉलेमीचा समज झालेला दिसतो.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी नदी म्हणून, हिचे महत्त्व वाढले आहे. या नदीवर शहापूर तालुक्यात बांधण्यात आलेल्या मोडक धरणाचा `मोडक सागर' हा जलाशय प्रसिद्ध आहे. येथील वैतरणा हे निसर्गरम्य ठिकाण पर्यटकांचे आकर्षण असून खर्डी या लोहमार्ग स्थानकापासून ते १३ किमी. वर आहे. येथे विश्रामधामाची सोय आहे.
नदीचा प्रवास:-
या नदीचे तीन मुख्य शीर्षप्रवाह असून ते नासिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील दापूरे गावाच्या उत्तरेस एकत्र येतात व तेथपासून वैतरणा नदीचा प्रवाह ठाणे व नासिक जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील थळघाटापर्यंत दक्षिणेस वाहत जातो. हा संपूर्ण प्रदेश खडकाळ व दऱ्याखोऱ्यांचा असल्याने या भागातून नदी अनेक वळणे घेत जाते. या मार्गात झारवड बुद्रुक (तालुका इगतपुरी) गावाच्या दक्षिणेस तिला उजवीकडून आळवंड नदी मिळते. या संगमानंतर वैतरणा नदी प्रथम आग्नेयीस, नंतर नैर्ऋत्येस व पुन्हा दक्षिणेस मोठे वळण घेते. या भागात तिने खोल निदरी तयार केली आहे. या प्रदेशात तिला मिळणाऱ्या प्रवाहांमुळे वैतरणेचा प्रवाह अखंड राहिला आहे. पुढे काही अंतर नासिक व ठाणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून गेल्यावर तिला डावीकडून भीमा ही एक लहान नदी मिळाल्यानंतर वैतरणा नदी थळघाटाजवळ एकदम पश्चिमेस वळून ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात व्हीगाव येथे प्रवेश करते. पुढे वाडा तालुक्याच्या पश्चिम सरहद्दीवर ती एकदम उत्तरेस वळते व मनोर गावाजवळ पुन्हा नैर्ऋत्य व नंतर दक्षिण -वाहिनी होऊन पालघर तालुक्याच्या दक्षिणेला नवघर येथे वैतरणा खाडीद्वारा अरबी समुद्राला मिळते. वैतरणा नदीच्या ठाणे जिल्ह्यातील पिंजळ, देहेरजा व सूर्या या महत्त्वाच्या तीन उपनद्या असून त्या तिला उजवीकडून अनुक्रमे आलमन (वाडा तालुका), दुर्वेस व साखरे (पालघर तालुका) या गावांजवळ मिळतात. याशिवाय वैतरणेला या जिल्ह्यात तानसा नदी डावीकडून वसई तालुक्यातील चिमणे येथे मिळते. अरबी समुद्रातून खाडीद्वारा सु. २५ किमी. आतापर्यंत वैतरणा नदी जलवाहतुकीस उपयुक्त ठरली आहे.
वैतरणा नदीखोरे नकाशा
पाणलोट क्षेत्र नकाशे:- WF-2, WF-1, WF-24, WF-20.
वैतरणा नदीचे टोपोशीट:-
(47E-9, 47E-5, 47E-10, 47E-6, 47E-2, 47E-14, 47E-11&15.)
वैतरणा नदीचे यात्रा करत असताना गावातील लोकांसोबत चर्चा केली असता एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला, ग्रामपंचायतच्या माध्यमातून नळाद्वारे सोडण्यात येणारे पाणी ८० टक्के लोक पिण्यासाठी वापरत नाहीत. गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी बर्याच ग्रामपंचायतीने नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे या उद्देशाने आरो प्लांट (वॉटर एटीएम) ग्रामपंचायत च्या बाहेर उभारले होते. या मध्ये पाच रुपयाला वीस लिटर पाणी नागरिकांना मिळत होते. परंतु त्याची देखभाल दुरुस्ती न केल्याने ते सर्व आरो प्लांट नादुरुस्त आहेत.
गावांमध्ये खाजगी आरो प्लांट मोठ्या प्रमाणात बसवण्यात आले असून, नागरिकांना वीस रुपयाला वीस लिटर पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. एका कुटुंबाला दररोज जवळपास 40 लिटर पाणी विकत घ्यावे लागते ज्याचा त्यांना प्रत्येक दिवशी 40रुपये खर्च करावा लागत आहे. नंदिनी(नासर्डी) नदी खोऱ्यातील गावांमध्ये आज-काल दुधा पेक्षाही पाण्यावर जास्त खर्च केला जात असल्याचे लोकांच्या बोलण्यातून समोर आले आहे.
वैतरणा नदीच्या प्रत्यक्ष यात्रे दरम्यान नंदिनी(नासर्डी) नदीचे पात्र हे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्याचे दिसून आले. नंदिनी(नासर्डी) नदी पात्रात प्रमुख तीन प्रकारचे अतिक्रमन दिसून आले.
1. विहिरींचे अतिक्रमण:-
2. शेतीचे अतिक्रमण:-
3. बांधकामाचे अतिक्रमण:-
1. विहिरींचे अतिक्रमण:-
नदीच्या काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांनी नदीपात्रात विहीर घेऊन त्या विहिरीला सिमेंट काँक्रीटचे कडे तयार केले असून त्या विहिरीतून निघालेला सर्व दगड, गाळ, माती हा राडाराडा नदीच्या पात्रातच टाकलेला आहे. त्यामुळे नदीची वाहन क्षमता खूपच कमी झाल्याचे दिसून आले. नदीपात्रात जवळपास 100 मीटर वरती एक विहीर असा भाग अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला आहे. आजूबाजूच्या व गावातील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली असता लोकांनी शेतकऱ्यांनी नदीच्या काठावर किंवा पात्रामध्ये विहिरी घेतल्या असेल तर विहिरी असू द्याव्यात परंतु विहिरीतून निघालेला गाळ, माती, कचरा इत्यादी राडाराडा शेतकऱ्याने तात्काळ बाजूला करावा आसे मत मांडले.
2. शेतीचे अतिक्रमण:-
नंदिनी(नासर्डी) नदीची यात्रा करत असताना प्रामुख्याने नदीपात्रात शेत जमिनीचे अतिक्रमण झाल्याचे आढळले. कारण काय तर ही नदी बारमाही वाहत नसल्याने ज्यावेळेस नदीपात्रात पाणी नसते त्यावेळेस शेतकरी आपला बांध नदीपात्रात सरकवतात आणि डायरेक्ट पीक नदीपात्रात घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्याचा वैयक्तिक फायदा होतो आहे. परंतु नदीची पाणी वाहन क्षमता व पाणी साठवण क्षमता कमी झाल्याचे दिसूनआले.
1. बांधकामांचे अतिक्रमण:-
नदीच्या काठावर असणाऱ्या प्रत्येक गावातील स्मशानभूमी नदीपात्रात असल्याचे आढळले. स्मशानभूमी नदीपात्रात आहेच सोबतच लोकांना तेथे उभे राहता यावे यासाठी नदीपत्रांमध्ये भराव टाकून काही ठिकाणी काँक्रीट तर काही ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवल्याचे दिसून आले. काही गावात नदीच्या पत्रामध्ये मंदिर व सार्वजनिक शौचालय असल्याचेही दिसून आले.
हि जैवविविधता कुळांनुसार विभागली जाते-
1) मासे:- या मध्ये काटला, रोहू, नकटा, म्रीगल, बास, शींधी, कुरळ, अश्या साधारण 19 प्रजाती आढळून येतात.
2) उभयचर:- 11 प्रजातींचे उभयचर म्हणजे बेडूक प्रजाती येथे आढळून येतात.
3) सरपटणारे प्राणी:- या मध्ये सर्प प्रजाती जसे नाग, घोणस, मण्यार, फुरसे, धामण, कवड्या, रुका सर्प, नानेटी, पानदिवड , कासव या प्रजातीचा वावर सुद्धा दिसून आला आहे.
4) पक्षी:- वैतरणा नदी खोर्यातील स्थानिक आणि स्थलांतरीत अश्या विविध पक्ष्यांच्या 190 पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. या मध्ये ब्राम्हणी घार, छोटा बगळा, बुलबुल, मोर यांसारख्या सामान्य पक्षी प्रजातींनसोबत तुतवार, हिरवी तुतारी, धाविक, वन घुबड, जांभळा बगळा, निलपरी, निळा माशिमार, रंगीत पानलावा, तीरचिमनी, अशा दुर्मिळ आणि काही स्थलांतरित पक्षी प्रजाती आढळून येतात. कवठेमहांकाळ तालुक्यातील नंगोळे गावात 4 वर्ष माळढोक पक्षी वास्तवास होता.
5) सस्तन प्राणी:-सस्तन प्राण्यांच्या एकूण 23 प्रजाती आढळून येतात. या मध्ये दुर्मिळ असलेल्या भारतीय लांडगा, खोकड, खवल्या मांजर, 5 पाट्यांची खार, मांज्याट यांसारख्या वन्य प्राण्या सोबत शेळ्या, मेंढ्या, म्हशी, गायी, यांच्या काही प्रजाती आढळून येतात.
कीटक, भुंगे, फुलपाखरे, मुंग्या, पतंग, माश्या, मधमाशी, यांसारख्या कीटकांच्या आणि कोळी, विंचू, खेकडे, गोचीड यांसारख्या अष्टपाद जीवांच्या कित्तेक प्रजाती आढळून येतत.
15 Jan 2025
15 Jan 2025
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
Our team is here to provide the guidance and resources you need. Together, we can achieve meaningful results.
Contact UsPune
The Indrayani River, originating near Lonavala in Maharashtra, holds significant religious and ecological importance. However, it faces severe pollution due to untreated domestic sewage, industrial effluents, and religious activities in towns like Alandi and Talegaon.
pune
The Bhima River, a major tributary of the Krishna River, faces significant pollution due to untreated industrial effluents, agricultural runoff, and domestic sewage. Rapid urbanization and industrialization along its banks have further exacerbated the problem, particularly in the Pune and Solapur districts.
Nashik
The Godavari River is facing water scarcity due to over-extraction for agriculture, industrial use, and growing urban demand. Large-scale irrigation projects, unregulated borewell drilling, and inefficient water management exacerbate the issue.