In Yavatmal District
River Length: 55 Km
Origin Location: Jalaka, Tal- Maregaon
Confluence Location: Vadjuga, Dist- Chandrapur
Name and Contact of The Coordinator:
Dr. Kishor Moghe 9422868949
Pranali Chikte 8788913062
नदीचा थोडक्यात इतिहास :- निर्गुडा नदी हि यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव तहसील मध्ये असून अम्बोरा उजाड येथून श्री शामराव रामपुरे यांचे शेतीमध्ये नदीचा उगम आहे तसेच या नदीचे उगमापासून पश्चीमेस १.५ कि मी अंतरावर हेमाड पंती मंदिर असून घनदाट जंगलात वसलेले आहे तसेच अम्बोरा उजाड शेती क्षेत्रास लागून घनदाट जंगल आहे नदीचे उगमापासून पूर्वेस चंद्रपूर यवतमाळ मार्ग ४०० मीटर अंतरावर आहे
- नदीचे उगमस्थान. (जिपीएस लोकेशन सहित)
- नदीची लांबी.
नदीची लांबी हि जळका गावातील आंबोरा उजाड उगमापासून वर्धा नदीचे संगमापर्यंत ८५ कि.मी. आहे
- कोणत्या नदीची उपनदी आहे.
वर्धा नदीची निर्गुंडा नदी हि उपनदी आहे
- या नदीच्या उपनद्या.
निर्गुडा नदीची लांबी हि ८५ कि मी असून त्या नदीची कुठलीही नदी उपनदी नाही
- नदीकाठची गावे.
बोटोनी, बुरांडा, खापरी, नवरगाव, डोर्ली, वेगाव, डोंगरगाव, पळसोनी, मुर्धोर्णी, वणी, मोहोर्ली, गणेशपूर, वागदरा, मंदर, वारगाव, शिरपूर, शेलू, पुरड, पुनवट, कवडशी, चिंचोली, शिवणी इत्यादी २२ गावे नदी काठावरील आहे.
- नदी खोऱ्यातील गावे.
जळका, बोटोनी, घोगुलदरा, खेकडवाई, शिवनाला, खडकी, घोददरा, रोह्पेट, खंडणी, मेंड्नी, सराटी, बुरांडा, हटवांजरी, करनवाडी, नरसाळा, कान्हाळगाव, मारेगाव, मागरूळ, गौराळा, कोलगाव, सगनापुर, गोधनी, सोमनाला, निंबाळा, राजूर, चिखलगाव, चारगाव, वारगाव, मेंढोली, पेटूर, केसुरली, निवली, नायगाव, सावंगी, एनाड, शेवाळा, शिन्दोला, यनक , कुर्ली, पारडी, खांडला, लाटी, बेसा, भालर, धोपटाळा, दहेगाव, विरकुंड, बोर्डा, झरपट इत्यादी ४९ गावे नदी खोऱ्यातील गावे आहे.
- नदीचा संगम. (जिपीएस लोकेशन सहित)
नदी खोऱ्यातील भूजल पातळी खूप खोलात गेली असून काही उंच खोऱ्यातील विहिरीची पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे नदी खोरे गावातील माथा ते पायथा काम करण्याची खूप गरज आहे प्रत्येक गावांचे तसे नियोजन करणे आवश्यक आहे.तसेच डोह मॉडेल या सारखी कामे करून घेणे आवश्यक आहे.व सामुहिक वन हक्क क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याची गरज असून त्या करिता संस्था, गाव, व शासन एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.
नदी खोऱ्यातील जलस्त्रोत हे नदी नदीची उपनाले सिंचन तलाव व पाझर तलाव आहे काही तलाव हे बारमाही पाण्याने भरलेले असते तर काही तलाव हे किमान ९ ते १० महिने पाणी उपलब्द असते.मुख्य नदीची उपनाले हे सुद्धा गाळणे भरलेले असून तसेच नदी व नदीच्या उप नाल्यावरील सिमेंट प्लग तुटफुट झाले असल्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. व त्यामुळे नदी खोऱ्यातील जल स्त्रोतावर दिवसेदिवस परिणाम होत आहे.
- तलाव (पाझर, साठवण, केटीवेअर, फड पद्धतीचे बंधारे) यांचे लोकेशन (जीपियस रीडिंग सहित) साठवण क्षमता सद्य परिस्थिती (दुरुस्त/नादुरुस्त, गाळणे भरलेले) इत्यादी.
सिंचन तलाव व पाझर तलाव हे गाळाने भरलेले असून पाणी साठवण क्षमता हि कमी झाली आहे तसेच मुख्य नदी व नदीचे उपनाले ह्या वरील शासनाने बांधलेली सिमेंट प्लग व के टी वेअर हे तुटफुट झालेले असून त्याची दुरुस्ती केली तर पुन्हा साठवण क्षमता वाढविण्यास मदत होईल या संदर्भातील काही जीपीएस रीडिंग फोटो उपलब्द असून पुन्हा काही फोटो आम्ही एकत्र करू. व आपणास उपलब्द करून देऊ.
पिण्याच्या पाण्याची समस्या नदी खोरे गावातील कुठल्याच गावात माहिती घेतली असता दिसून आली नाही त्यामुळे उपाययोजना करण्याची काहीच गरज नाही असे एकंदर आहे. एकंदर प्रत्येक गावात चांगल्या प्रकारची पिण्याची सोय गावांमध्ये आहे.
- ग्रामपंचायत आरो प्लांट & खाजगी वाटर ए टी एम
गावपातळीवर काही गावात ग्रामपंचायतीचे आरो प्लांट आहे मात्र नेमकी संख्या किती हे सांगता येणे शक्य नाही परंतु संख्या मात्र खूप कमी आहे प्रत्येक गावात आहे अशी स्थिती नाही. मारेगाव, वणी, राजूर चिखलगाव या गावात खाजगी आरो प्लांट आहे.
- गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहारी, आड किंवा पाण्याचे इतर स्त्रोत यांची माहिती. (लोकेशन सहित.)
या प्रश्नांच्या अनुषंगाने विहिरी व इतर पाण्याचे स्त्रोत या संबधित लोकेशन घेतलेले नाही आहे ज्या ठिकाणी संस्थेने डोहाची कामे केली आहे त्या ठिकाणचे लोकेशन प्राप्त आहे.
- पिण्याचे पाण्याची उपचार पद्धती. (क्लोरीन, ब्लिचिंग इ.)
प्रत्येक गावात पिण्याचे पाण्याचे स्त्रोत आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायत, नगरपंचायत, व नगरपरिषद क्लोरीन, ब्लिचिंग ची व्यवस्था करीत असते
गावातील वापरात आणले जाणारे डीटर्जट पावडर, केमिकल युक्त साबनी, कोलमाईन्स मधून येणारे दुषित पाणी यावरील शासन स्तरावरून कुठलेच निर्बंद नाही त्यामुळे दुषित पाणी सरळ नदीत येत आहे तसेच शेती मध्ये वापरले जाणारी रासायनिक खते , कीटकनाशके याचा परिणाम नदीतील पाणी यावर झालेला आहे तसेच नदी मधी असणारी जैवविविधता यावर आघात झालेला आहे.
- घरगुती सांडपाण्याचे प्रदूषण.
भांडी धुण्याकरिता आधी गावातील लोक राखेचा उपयोग करीत होते परंतु आज प्रत्येक गावात भांडी धुण्याकरिता केमिकल युक्त साबनी तसेच कपडे व अंग धुण्याकरिता केमिकॅल युक्त साबनी वापरल्या जातात आधी प्रत्येक घरी शोष खड्डे असत परंतु गावात आता नाल्या असल्यामुळे घरगुती सर्व पाणी नाली तून नाल्यात व नालीतून नदीत जाते त्यामुळे खोऱ्यातील नदीचे उपनाले व नदी प्रदूषित झालेली आहे व त्यामुळे नदीतील मासे यावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे गावातील सर्व सांडपाणी हे एकत्र करून त्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी नदीत सोडण्याची गरज आहे व त्या संदर्भात गावातील लोकांमध्ये जाणीव निर्माण करण्याची गरज आहे.
- औद्योगिक व कारखान्यांचे विषारी रासायनिक सांड पाणी.
निर्गुडा नदी ही उगमापासून चालू होते तर ३२ कि मी पर्यंत कुठलीही औद्योगिक वसाहत नाही ३२ कि मी झाल्यानंतर वणी पासून कोलमाईन्स एरिया चालू होते तसेच वणी शहरातील छोट्या स्वरूपाच्या ज्या काही कंपन्या आहेत त्यातील दुषित पाणी सुद्धा नदीत जाते त्यामुळे ३२ कि मी चे पुढे जास्तीत जास्त नदी हि विषारी रासायनिक युक्त केमिकल मुळे दुषीत झाली आहे.
- शहरी भागातून निघणारे सांडपाणी.
शहरी भागातून निघणारे सांडपाणी यावर कुठल्याही प्रकारची सांडपाणी यास शुद्ध करून सोडणे अशी यंत्रणा नसून सरळ नदीत जात आहे त्यामुळे नदी हि जास्त प्रदूषित झाली आहे.
- रासायनिक शेती मधून निघणारे सांड पाणी. वाढती रासायनिक खते व कीटकनाशके यामुळे त्यातून निघणारे सांडपाणी या संदर्भात कुठलीही शासकीय यंत्रणा काम करीत नाही त्यामुळे शेती मधून निघणारे विषयुक्त पाणी हे सरळ नदीत जात आहे त्यामुळे नदी विषयुक्त झाली आहे. त्यामुळे नदी हि विषमुक्त करायची असेल तर शेतकरी यांना नैसर्गिक शेतीकडे वळविणे व शहर व खेडी यातून येणारे सांडपाणी कंपन्याचे निघणारे सांडपाणी यावर काम करण्याचिऊ गरज आहे.
- आधुनिक शेती मधून अच्छादनाचे निघालेले टाकाऊ घटक (प्लास्टिक मल्चिंग पेपर, ड्रीप पाईप,)
ज्या भागातून निर्गुडा नदी जाऊन आहे त्या भागात मल्चिंग पेपर किवा ड्रीप चे परम,अन नगण्य असून नदीत जात आहे हे असे नाही परंतु वाढते तापमान व हवामान बदल मुळे होणारे परिणामाला समोर जाण्यास शेतकरी तयार झाला तर पुढे हे धोके संभवू शकते.
- घनकचरा व्यवस्थापन. (सागर मित्र अभियान)
शहरामधून निघणारा व खेडे गावात निघणारा घन कचरा कुठे टाकायचा व त्याला कसा संपवायचा या संदर्भात कुठलीच यंत्रणा नाही कायदे आहे परंतु त्याचे नियम पाळले जात नाही त्यामुळे गावात निघणारे पॉलीथीन छोटे टायर चपला असा अनेक प्रकारचा घन कचरा नदीत वाहत येट आहे व त्यामुळे त्या घन कचऱ्याचा परिणाम हा नदीतील जैवविविधतेवर वर झालेला आहे. या करिता घन कचरा व्यवस्थापन या संदर्भात लोकांची जाणीव करून देणे व अभियान करणे अंत्यंत आवश्यक आहे असे अभ्यासा अंती दिसून आलेले आहे.
नदीची जी जमीन आहे त्यात पाहणी केली असता लोकांनी अतिक्रमण केलेले आहे असे चित्र मात्र कुठेही आढळून आले नाही परंतु पुराचे पाण्यासोबत वाहून येणाऱ्या गाळाचे प्रमाण वाढले असून नदीची रुंदी मात्र कमी झाली आहे हे विशेष करून दिसून आले आहे.व त्यामुळे शेतीमधून पाणी घुसणे पिकांचे नुकसान होणे हे प्रमाण मात्र वाढले आहे.
- विहरीचे अतिक्रमण.
उगमापासून तर संगमापर्यंत नदीची पाहणी केली असता नदीचे पात्रात किवा नदीला एकदम लागून विहिरी खोदल्या व त्याचा परिणाम हा नदीवर झाला आहे असे कुठेही आढळून आले नाही
- शेतीचे अतिक्रमण.
नदीची जी जमीन आहे विशेष करून नदीचे जे काट आहे त्या काटावर शेतकरी यांनी अतिक्रमण केले आहे व नदीला अडथळा निर्माण झाला आहे हे चित्र नाहीच असल्यात आहे
- बांधकामाचे अतिक्रमण.
नदीला एकदम लागून बांधकाम केले आहे त्यामुळे नदीचे प्रवाहात अडचण निर्माण झाली आहे असे कुठेच आढळून आले नाही
- रस्त्याचे अतिक्रमण.
नदीतून रस्ते काढले आहे व नदीचे क्षेत्रात पक्के किवा सिमेंट रोड काढून नदीला त्याचा फटका बसला आहे हे कुठेच दिसून आले नाही गावकरी, शेतकरी यांनी असे प्रयत्न केले आहे हे मात्र नदी परिक्रमा केली असता दिसून आले नाही किवा माहिती घेतली असता लोकांनी असे प्रकार घडलेले नाही हे विशेष करून सांगितले आहे.
- नदी पात्रातील गौणखनिज उत्खनण. (वाळू उपसा)
नदीतील वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून त्याचा परिणाम नदीवर झाला आहे वाळूमध्ये पाणी साठवून ठेवण्याची जी क्षमता होती ती मात्र कमी झाली आहे. तसेच नदीच्या प्रवाहात फरक पडला असून वाहून येणारे पुराचे पाणी यामुळे शेती पिकास नुकसान पोचत आहे
नदीतील पुराचे पाणी आधी गावात घुसत नव्हते परंतु अलीकडे जास्त गाळामुळे नदीचे मुख्य प्रवाह हे बदले असून पु परिस्थिती निर्माण झाल्यास शेत्मध्ये पाणी घुसणे शेतीचे नुकसान असे प्रश्न निर्माण झाले आहे. तसेच नदीत जास्त गाळ साचल्यामुळे पाणी पाहिजे तसे नदीत उपलब्द राहत नाही त्यामुळे दुष्काळ या सारखे प्रश्न देखील गावांना भेडसावत आहे.
- नदी खोऱ्यातील पूर व दुष्काळाचा इतिहास व कालावधी.
१९७२ मध्ये नदीला पाणी नव्हते असे गावातील लोकांनी सांगितले असून त्या काळात जनावरे यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसेच गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता पाऊस एकदम कमी झाला होता त्यामुळे अशी स्थिती निर्माण झाली असे शेतकरी यांनी सांगितले.
- नदी खोऱ्यात पूर व दुष्काळाने व्यक्ती व मालमत्तेचे झालेले संभाव्य नुकसान.
नदी खोऱ्यात पूर परिस्थिती निर्माण झाली कि जास्त नुकसान हे शेतकरी यांच्या पिकांचे होते वणी सारख्या शहरात नदीला लागून असलेली वस्ती यामध्ये पुराचे पाणी घुसले कि मालमत्तेचे नुकसान देखील तेथिल परिवारांना सोसावे लागत असते.घरांच्या भीती पडणे कचे घर असेल तर पडणे असे संभावित धोके सहन करावे लागत असते.
- नदी खोऱ्यात पूर व दुष्काळ निवारणा साठी केकेले उपाय.
नदी खोऱ्यात पूर व दुष्काळ निवारण करिता शासन स्तरावरून खूप काही असे ठोस काम झालेली दिसून येतनाही तसेच ज्या गावात व शेतीमध्ये पूर घुसून नुकसान होत आहे तिथे शासन स्तरावरून त्वरित कामे करून घेण्याची गरज आहे.
नदी खोऱ्यातील जंगलाची स्थिती बघितल्यास जंगलाचे प्रमाण हे काही ठराविक गावात आहे ज्या ठिकाणी आदिवासी वसलेले आहे त्याच क्षेत्रात जंगल आहे. परंतु जंगलाची स्थिती सध्याच्या तुलनेत चांगली आहे काही ठराविक गावात सामुहिक वनहक्क प्राप्त झाला असून त्या गावासोबत संस्थेचे काम चालू आहे ग्रामसभेस काय अधिकार दिले आहे ग्रामसभेस सामुहिक वनहक्क क्षेत्रात कशा प्रकारची कामे ग्रामसभा यांनी करणे अपेक्षित आहे या संदर्भात संवर्धन व्यवस्थापन आराखडे बनविले गेले आहे व त्यानुसार ग्रामसभा यांनी शासन सोबत कामे करावी म्हणून प्रयत्न चालू आहे.व ग्रामसभा त्या पद्धतीची कामे करीत आहे.
जंगलातील महत्वाच्या आधी कुठल्या स्पेसीज होत्या व पुन्हा वाढविण्या करिता बीज गोळा करणे व जून महिन्यात त्या बियांची ग्रामसभा सदस्यांना सोबत घेऊन टोबणी करणे अशा प्रकारचे उपक्रम लोक सहभागातुन केल्या जात आहे. त्यामुळे जंगल वाढीस चांगला फायदा होत आहे.
जंगलाला लागणारी आग व त्या पासून जंगलाचे होणारे नुकसान यावर ग्रामसभा यांनी प्रतिबंद आणला असून जंगलाची होणारी नैसर्गिक वाढ चांगल्या प्रकारे होत आहे असे दिसून येत आहे.
खंडणी, मेंड्नी, रोह्पेट, रायपुर, बोटोनी, सालेभटी प्रामुख्याने ह्या गावात जंगल आहे व इतर गावात मात्र जंगल नाही
- जल अभयारण्य संरक्षित करणे. (water sanctuary concept)
- वृक्षारोपणासाठी उपलब्ध जागा पाहणे.
निर्गुडा नदी संदर्भात संस्था पातळीवर अभ्यास केला असता नदीचे काठावर बांबू या सारख्या रोपांची लागवड करण्याचे निदर्शनात दिसून आले आहे तसेच नदी काठावरील शेतकरी यांना उत्पनाचा स्त्रोत उपलब्द व्हावा म्हणून शेवगा या सारखी रोपे लागवड करण्यास चांगल्या संधी उपलब्द आहे एक तर नदीचे काठ सुरक्षित राहील तसेच शेतकरी यांना त्या झाडांपासून उत्पन्न मिळत राहिले म्हणजे स्वत शेतकरी त्या झाडांची काळजी घेतील व अशा पद्धतीचा अभ्यास हा संस्था पातळीवर केला आहे.
- घना वनसाठी साइट्स .
निर्गुडेच्या उगम क्षेत्रा पासून ४०० ते ५०० मी अंतरावर बोटोनी त. मारेगाव जि. यवतमाळ या गावच्या CFR क्षेत्रात चांगल्या sites उपलब्द आहे. त्यात पुन्हा मिश्र लागवड केल्यास चांगल्या sites उपलब्द होऊ शकते त्या करिता चांगली संधी आहे.
- मियावाकी जंगल साठी उपलब्ध जागा.
मियावाकी जंगल तयार करण्या साठी बोटोनी त. मारेगाव जि.यवतमाळ या गावातील CFR क्षेत्रात तशा प्रकारच्या sites उपलब्द आहे तसेच जि रोपे लागवड केली जातील. रोपांना वाढविण्यासाठी पाण्याची सुद्धा सोय उपलब्द आहे
- वन विभागाच्या अधिकाऱ्याचे नाव व मोबाईल नंबर. मा. श्री हटकर वन परिक्षेत्र अधिकारी 7744929178
- सीसीटी, डीप सीसीटी, लूजबोल्डर डॅमसाठी उपलब्ध साइट्स.
या करिता CFR क्षेत्रात चांगल्या प्रकारच्या sites उपलब्द असून CFR क्षेत्रात कुठे कोणत्या भागात कामे केली पाहिजे या संदर्भात ग्रामसभा यांचे कडे संवर्धन व्यवस्थापन आराखडे यांचा आधार घेण्यास संधी उपलब्द आहे.जे CFR क्षेत्र आहे त्या संदर्भात MAP असून कुठल्या भागात कुटली कामे होऊ शकते या संदर्भात पूर्ण नियोजन तयार आहे.
- वनताल (फॉरेस्ट लेक) साठी उपलब्ध साइट .
खंडणी मेंड्नी रोह्पेट या गावांना CFR क्षेत्र जे प्राप्त झाले आहे त्यामध्ये वनतलाव करिता चांगल्या sites उपलब्द असून त्या sites वर भविष्यात काम झाल्यास पाण्याचे चांगले स्त्रोत उपलब्द होईल जंगली जनावरांना पिण्याच्या पाण्याच्या sites निर्माण होतील व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.
नदी खोऱ्यातील जी गावे आहेत त्या गावातील आधी ज्वारी, कपासी, सोयाबिन, तूर हि खरीप हंगामातील मुख्य पिके आहे. व रब्बी हंगामात गहू चना व भाजीपाला या सारखी पिके सारखी पिके घेतली जात आहे परंतु खूप मोठ्या प्रमाणात हि पिके घेतली जाते असे मात्र चित्र नाही. एकंदर गावाच्या भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत बघितल्यास २ ते ३ % एवढेच रब्बी क्षेत्र आहे. मात्र उन्हाळी पिके संस्थेने डोहाचे काम केले तेव्हापासून ७ कि मी चे परिसरात ४ ते ५ शेतकरी बोटोनी या गावात घेत आहे. ज्यात उन्हाळी ज्वारी, भुईमुग व वांगी चवळी टमाटर इत्यादी.
- नदीपात्रात पेरलेल्या पिकांचे प्रकार. (डाळवर्गीय, तेलबिया, तृऋनध, कडधान्य)
निर्गुडा नदीचे पात्रात कुठल्याही प्रकारचे पिके घेतली जात नाही.
- गाव, तालुका, तिल्ह्यात खते आणी कीटकनाशकांचा वापर.
नदी खोऱ्यातील जी गावे आहेत या सर्व गावात रासायनिक खते व कीटकनाशके याचा वापर केल्या जात आहे. सोबतच शेणखत याचा देखील मोठ्या प्रमाणावर शेतकरी वापर करीत आहे. मागील ४ ते ५ वर्षापासून निर्गुडेच्या एकंदर २० गावात नैसर्गिक शेतीचा प्रचार व प्रसार चालू असून गावपातळीवर १ ते २ एकर १०० % नैसर्गिक शेतीचे डेमो करणे चालू आहे त्या संदर्भात शेतकरी यांचे “ फार्म फिल्ड स्कूल ” या सारखे कार्यक्रम आयोजित केले जात आहे.
ज्यात रासायनिक खते कीटकनाशके याचा शेतजमीन तसेच नदी व भूगर्भातील पाणी, जैवविविधता यावर काय परिणाम होत आहे या संदर्भात शेतकरी व गावकरी यांचे सोबत सातत्याने चर्चा चालू असून शेतकरी देखील नैसर्गिक शेती संदर्भात विचार करीत आहे
- नदी खोऱ्यातील आढळणाऱ्या फळझाडांचे प्रकार.
नदी खोऱ्यातील मुख्य आढळणारी फळझाडे हि जंगलात म्हणजे चार, बिबा, बेहाडा मोह आवळा चिंच काही प्रमाणात जांभूळ बोर यासारखी मुख्यत्वे फळझाडे आहेत
तसेच शेती शिवारात आंबा, सीताफळ डाळिंब संत्रा पेरू काही प्रमाणात मोसंबी अशी फळझाडे आहे परंतु याचे प्रमाण मात्र नगण्य आहे खूप मोठ्या प्रमाणात फळबागा आहे असे चित्र मात्र नाही.
- नदी खोऱ्यातील भाज्यांचे प्रकार.
रानभाज्या याचा विचार केल्यास कटूरले रानमाठ,कुकुर्डा,चिलधावन्दा,बांबू कंद रानमाठ,कपाळफोडी, तरोटा,पांढरी मुसळी,मसालापान,चीवटा, इत्यादी
वांगी, टमाटर, मिरची मेथील पालक चवळी भेंडी,वाल शेवगा, बरबटी गव्हार, दोडकी कारली, लवकी मात्र फुलकोबी पता कोबी याची लागवड मात्र खूप कमी आहे नसल्या सारखीच आहे
- नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याची यादी.
कृषी विभाग व संस्था समन्वयातून नैसर्गिक शेतकरी गट तयार करणे सुरु आहे.
नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याची यादी.
- प्रगतशील शेतकरी आणि त्यांची खासियत
श्री.कैलास डोंगरकर बोटोणी, शामराव रामपुरे,दादाराव आत्राम
- प्रत्येक पिकाकासाठी सरासरी पाण्याचा (प्रती एकर) वापर.
निर्गुडा खोऱ्यात सिंचन खूप कमी असून खरीप हंगामात तूर व कपासी व सोयाबीन हि मुख्य पिके आहे या पिकांना पाणी देण्याची पद्धत हि स्प्रिंकलर व पट पाणी देण्याची पद्धत आहे त्यामुळे नेमका किती प्रमाणात पाणी वापरले जाते हे मात्र सांगता येणे कठीण आहे जशी जशी पिकाला पाण्याची गरज पडल्यास त्या प्रमाणे पाणी दिल्या जाते.
खूप काही असे प्रगत तंत्र सिंचनासाठी शेतकरी वापरत आहे हि स्थिती नाही किवा नेमके किती पाणी दिले जात पाणी मोजता येईल असे तंत्रज्ञान नाही आहे.
गहू ह्या पिकास सात ते आठ वेळा पाणी देण्याची पद्धत आहे तसेच चना ह्या पिकास किमान २ ते ३ वेळा पाणी दिले जाते
केळी उस या सारखी जास्त पाणी लागणारी पिके मात्र नदीचे खोरे गावात घेतल्या जात नाही
- नदी खोर्यात हवामान बदलाचा पिकावर होणारा परिणाम. आणि त्यावर उपाय. Climate Resilient Agriculture Practices.
१ वणी तहसील मध्ये कोयला खाणी असल्यामुळे कोयल्याची धूळ पूर्ण हवामानात असून त्याचा पिकावर परिणाम झालेला आहे पिकांवर कोयला डस्ट बसत असल्यामुळे पिकांची पाहिजे तशी वाढ होत नाही कपासी सारखे पिक काळे पडत असल्यामुळे त्याचा परिणाम हा येणाऱ्या पिकावर होत आहे.
नदी खोरे गावातील विशेष करून वणी तहसीलमध्ये जवस, तीळ, देशीज्वारी(वाणी) या सारखी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जात असत परंतु आता लागवड करून देखील पाहिजे तसे उत्पादन येत नसल्यामुळे ती पिके घेणे बंद झाली आहे.
मारेगाव तहसील मधील विशेष करून आदिवासी क्षेत्रात मुग, उडीद, तीळ बाजरी ज्वारी या सारखी पिके घेतली जात असत परंतु आता लागवड करून देखील हि पिके पाहिजे तसे उत्पादन होत नाही त्यामुळे हि पिके नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. व झाली देखील आहे.
नदी खोऱ्यातील प्रदूषण पशुधन आधी मोठ्या संख्येने होते परंतु अलीकडे पशुधन हे कमी झालेले आहे कॅश क्रॉप पिके घेण्याचे प्रमाण वाढले असून नदी खोरे गावातील मुख्य हे कपासी आहे आधी ज्वारी मोठ्या प्रमाणावर घेतली जायची त्यामुळे जनावरांचा चारा हा प्रश्न नव्हता चारा उपलब्द होता त्यामुळे शेतकरी व शेतमजूर यांचे घरी पशुधन असायचे परंतु चारा हा प्रश्न असल्यामुळे पशुधन हे कमी झाले आहे.
तसेच पशुधन चाराईचे दर देखील हे सर्व सामान्य व्यक्तीला न परवडण्या सारखे असून त्यामुळे देखील पशुधन शेतकरी फार ठेवत नाहि विशेष करून आदिवासी समाज हा चांगली जनावरे तयार करणे विकणे व त्यातून कुटुंबाची उपजीविका भागविणे. परंतु आता चारा नसल्यामुळे जनावरे घरी ठेवली जात नाही.
आदिवासी क्षेत्रात दुधाचे प्रमाण हे अल्प आहे आदिवासी क्षेत्रात आदिवासी जनावरे पाळतात परंतु दुध काढणे हा त्यांचा पिंड नाही निर्गुडा खोऱ्यातील वणी भागातील गावात वणी शहरात दुध विक्रीकरिता जनावरे पाळली जातात यात गायी कमी पाळल्या जाते.म्हशीचे दुध जास्त काढल्या जाते परंतु ज्या वणीचे समोरील गावात जशी आधी जनावरे दुधा करिता पाळली जात असत. ती मात्र आज कमी आहे.
गावातील व शहरातील सांडपाणी, कंपन्यातून निघणारे सांडपाणी,घनकचरा हे सरळ नदीत जात असून नदी मधील व नदीच्या आजूबाजूची जैवविविधता धोक्यात आली आहे मासे तसेच नदीतील इतर जीवजंतू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तसेच वाढते हवामानातील बदल त्यामुळे खोऱ्यातील जैवविविधता यावर देखील परिणाम झाला आहे शेतीतील जैविविधता यावर देखील परिणाम झालेला आहे.
- नदीतील जल वनस्पती, जलचर, मासे. (फ्लोरा & फौना)
पूर्वी नदीत चांगले मासे मिळत असत विशेष म्हणजे अनेक जातीचे मासे त्यातून भोई समाजास चांगला रोजगार मिळत असे परंतु अलीकडे मासे मिळणे कठीण झाले त्या मागचे कारण काय तर नदीतील वाढती घाण प्रदूषित पाणी यामुळे माशांच्या जाती नष्ट झाल्या अशी माहिती प्राप्त झाली ज्यात झिंगा, वाहूर, बोट्रे, व बारीक मासे हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे अशी माहिती हि भोई समाजाकडून प्राप्त झाली.तसेच नदी च्या पाण्यावरील जलपर्णी वनस्पती हि जास्त वाढल्यामुळे त्याचा एकंदर परिणाम हा जैवविविधता व नदीतील जलचर प्राणी यावर दिसून येतो.
- नदीची परीसंस्था.
नदीची परिसंस्था हि धोक्यात आली असून नदीतील ज्या वनस्पती होत्या गवत शेवाळ ते नष्ट होत असल्यामुळे त्यावर जगणारे साप मासे बेडूक पक्षी कीटक खेक्कडे झिंगे इत्यादी ज्या वाढत असत त्या आता लोप पावत चालल्या आहे जी नदी आधीची होती ज्या वनस्पती होत्या जी विविधता होती ती आता पाहण्यास मिळत नाही असे गावातील लोकांनी सुचविले आहे.
नदी यात्रा दरम्यान लोकांशी सवांद साधला असता नदीला latina या वनस्पतीने जास्त वेधले असून टो काढणे जास्त गरजेचे आहे. हि माहिती आली. नदीचे खोलीकरण करून घेणे व एकंदर जी आधी नदीची जैवविविधता होती ती आज नाही असे लोकांचे मत पडले पुरामध्ये गाळ वाहून येण्याचे प्रमाण वाढले असून नदी बुजत आहे तसेच नदी शिवारात झाडांची संख्या वाढविली गेली तर माती वाहून प्रमाण नक्कीच कमी करता येईल हे विशेष करून लोकांनी सुचविले आहे. व नदीला धरून चांगला आराखडा तयार करण्याची गरज आहे हे विशेष करून सुचविले आहे.
भोई समाजाची उपजीविका आधी नदीवर अवलंबून होती चांगल्या प्रकारचे मासे आधी नदीत होते परंतु मासे मिळणे कठीण झाले आहे व उपजीविका धोक्यात आली आहे.असे विशेष करून नदी काठावरील असलेला भोई समाज व शेतकरी यांनी सुचविले
नदीला अविरल निर्मल व बारमाही वाहत कशी राहील या करिता ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट उगम खोऱ्यातील एकंदर १५ गावाच्या क्षेत्रात काम करीत आहे परंतु त्या करिता लागणारे आर्थिक स्त्रोत पाहिजे तसा नाही जरी संस्था संस्थेच्या पातळीवर काम करीत आहे परंतु नदीला निर्मल आणि बारमाही नदी वाहण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होणे व प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याची गरज आहे. संस्था पातळीवर नदी खोरे गावात ग्रेडेड बंड, lbs gabian structure, डोहा मॉडेल ( नदी खोलीकरण ) तसेच recharge pits नदी काठावर बांबू शेवगा रोपे लागवड व फळबाग कार्यक्रम या सारखे उपक्रम चालू आहे.
नदी यात्रे दरम्यान गावातील ठराविक मंडळी व संस्था प्रतिनिधी जोडले गेले व एकंदर नदीला धरून कशी कामे करून घेता येईल या संदर्भात माहिती प्राप्त करून घेतली.
तसेच या यात्रेत पाणलोट क्षेत्र विकासावर काम करणारे तज्ञ व्यक्ती यांचा सहभाग घेण्यात आला.
15 Jan 2025
15 Jan 2025
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
Our team is here to provide the guidance and resources you need. Together, we can achieve meaningful results.
Contact UsPune
The Indrayani River, originating near Lonavala in Maharashtra, holds significant religious and ecological importance. However, it faces severe pollution due to untreated domestic sewage, industrial effluents, and religious activities in towns like Alandi and Talegaon.
pune
The Bhima River, a major tributary of the Krishna River, faces significant pollution due to untreated industrial effluents, agricultural runoff, and domestic sewage. Rapid urbanization and industrialization along its banks have further exacerbated the problem, particularly in the Pune and Solapur districts.
Nashik
The Godavari River is facing water scarcity due to over-extraction for agriculture, industrial use, and growing urban demand. Large-scale irrigation projects, unregulated borewell drilling, and inefficient water management exacerbate the issue.