Background

Mahakali River

Home / River

Mahakali River

In Sangli district

River Length: 22.5 Km


 Origin Location: Basappachi Wadi Lak

 Confluence Location: Nagnur Taluka Athani

 

 Name and Contact of The Coordinator: 

 Ankush Narayankar 7066599199

Mr. Sagar Patil 9405555151

Introduction of River

महांकाली नदी ही कृष्णा नदी ची सर्वात महत्वाची उपनदी आहे.

महांकाली नदीचा उगम सांगली जिल्ह्यातील कवठे माहांकाळ, तालुक्याच्या बसप्पाची वाडी गावात होतो.

या नदीची लांबी २२.५ कि.मी. असून, महाराष्ट्रामध्ये १३.५ कि.मी. आणि कर्नाटकामध्ये ९ कि.मी. आहे.

महाराष्टात महांकाली नदीचे खोरे कवठेमहांकाळ, जत या दोन तालुक्यात आहे. या दोन तालुक्यातील २० गांवे महांकाली नदीखोऱ्यात आहेत.

महांकाली नदी चे खोरे के. आर. ३८ या पानलोटात आहे.  

शिंगणपुर हे महाराष्ट्रातील नदी काठावरील शेवटचे गांव आहे.

महांकाली नदीचा एकुण एरिया हेक्टर.म्हणजे  SQ.KMS आहे. ही नदी पुढे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील नगानुर या गावात जावून अग्रणी नदीस मिळते. 


महांकाली नदीचा इतिहास:-

  महांकाली नदी ही 1972 च्या अगोदर केरेवाडी आणि शेळकेवाडी या दोन गावाच्या डोंगरातून निघणारे ओढे आगळगाव,आरेवाडी, इरळी मार्गे येऊन मोघमवाडी, बसप्पाचीवाडी, कोकळे मार्गे अग्रणी नदीला जाऊन मिळत होते. 1970 च्या दशकामध्ये बसप्पाचीवाडी, मोघमवाडी आणि अंकले या तीन गावाच्या हद्दीवरती एक मोठ्या तलावाचे बांधकाम करण्यात आले. या तलावाला बसप्पाचीवाडी तलाव या नावाने ओळखले जाते. सध्या परिस्थितीला या तलावाच्या पायथ्याशी महांकाली नदी उगम पावते असे मानले जाते. वयस्कर लोक सांगतात 1970 च्या अगोदर कोकळे गावामध्ये साधारणता अडीचशे फूट रूदीचे या नदीचे पात्र होते. भरपूर पाणी या नदीला येत होते. त्यावेळेस कोकळे गावचे लोक मोठ्या काईल मध्ये बसून डफळापुरला जात होते आणि डफळापुर ची लोक मोठ्या काईल मध्ये बसून कोकळे येत होते. आजही नदीचे पात्र खूप मोठे असल्याचे दिसून येते. परंतु वरती तलाव झाल्याने ही नदी हळूहळू करत 2000 साला पर्यंत सुकत गेली आणि 2000 ते 2015 पर्यंत ही नदी कोरडी होती. या नदीवर ती 22.5 किलो मीटरच्या अंतरा मध्ये एकही बंधारा नव्हता. जल बिरादरी व लोक सहभागाच्या माध्यमातून या नदी पात्रावर पाच बंधारे बांधण्यात आले. 2017 पासून आजच्या तारखेपर्यंत ही महांकाली नदी एकदा ही कोरडी पडली नाही. आसा या आपल्या महांकाली नदीचा इतिहास आहे.


नदी काठाची गावे :-

अंकले, बसप्पाची वाडी, कोकळे, डाफळापूर, कुडन्नुर, कर्लहाटी, शिंगणपुर


1. आगळगाव

2. आरेवडी

3. बसप्पाची वाडी

4. ढालेवाडी

5. इरळी

6. कर्लहाटी

7. केरेवडी  

8. कोकळे

9. लंगरपेठ

10. मोघामवाडी

11. शेळकेवाडी  

12. अंकले

13. बाज  

14. बेळुंखी

15. डाफळापुर  

16. डोर्ली  

17. खलाटी

18. कुडन्नुर  

19. मिरवाड  

20. शिंगणापुर  

River Samvaad Yatra


कलश पूजन कार्यक्रम


बसाप्पाची वाडी


डफळापूर


कार्ल्हाटी


कोकळे


कुडनुर


शिंगणापूर

River Basin Villages and Related Maps

सांगली जिल्हा नकाशा

महांकाली नदीखोरे नकाशा


पाणलोट क्षेत्र नकाशे:-

(के.आर. 38.)


महांकाली नदी खोऱ्यातील तालुके यांचे नकाशे:-

(कावठे महांकाळ, जत.)

Pollution of River and Streams

या ठिकाणाहून गावातील सांड पाणी कोणतीही प्रक्रिया न करता महांकाली नदी पत्रात जाते आणि नदीतील स्वछ पाण्याला 

1.

बसप्पाची वाडी

अंकले रोड च्या बाजूला

2.

कोकळे

पशू व्यद्यकीय दवाखाना जवळ.

3

कुडनूर

कोकळे रोड जवळ.

4

शिंगणापुर  

गावाच्या पंचशीम बाजूला

Encroachment on River Lands

महांकाली नदीच्या प्रत्यक्ष यात्रे दरम्यान अग्रणी नदीचे पात्र हे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्याचे दिसून आले. अग्रणी नदी पात्रात प्रमुख तीन प्रकारचे अतिक्रमन दिसून आले.

1.     विहिरींचे अतिक्रमण:-

2.     शेतीचे अतिक्रमण:-

3.     बांधकामाचे अतिक्रमण:-  

1.   विहिरींचे अतिक्रमण:-

         नदीच्या काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांनी नदीपात्रात विहीर घेऊन त्या विहिरीला सिमेंट काँक्रीटचे कडे तयार केले असून त्या विहिरीतून निघालेला सर्व दगड, गाळ, माती हा राडारोडा नदीच्या पात्रातच टाकलेला आहे. त्यामुळे नदीची वाहन क्षमता खूपच कमी झाल्याचे दिसून आले. नदीपात्रात जवळपास 100 मीटर वरती एक विहीर असा भाग अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला आहे. आजूबाजूच्या व गावातील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली असता लोकांनी शेतकऱ्यांनी नदीच्या काठावर किंवा पात्रामध्ये विहिरी घेतल्या असेल तर विहिरी असू द्याव्यात परंतु विहिरीतून निघालेला गाळ, माती, कचरा इत्यादी राडारोडा शेतकऱ्याने तात्काळ बाजूला करावा आसे मत मांडले.


2.   शेतीचे अतिक्रमण:-

          महांकाली नदीची यात्रा करत असताना प्रामुख्याने नदीपात्रात शेत जमिनीचे अतिक्रमण झाल्याचे आढळले. कारण काय तर ही नदी बारमाही वाहत नसल्याने ज्यावेळेस नदीपात्रात पाणी नसते त्यावेळेस शेतकरी आपला बांध नदीपात्रात सरकवतात आणि डायरेक्ट पीक नदीपात्रात घेतले जाते. त्यामुळे एका शेतकऱ्याचा वैयक्तिक फायदा होतो आहे. परंतु नदीची पाणी वाहन क्षमता व पाणी साठवण क्षमता कमी झाल्याचे दिसून आले.

3.   बांधकामांचे अतिक्रमण:-

   नदीच्या काठावर असणाऱ्या प्रत्येक गावातील स्मशानभूमी नदीपात्रात असल्याचे आढळले.  स्मशानभूमी नदीपात्रात आहेच सोबतच लोकांना तेथे उभे राहता यावे यासाठी नदीपत्रांमध्ये भराव टाकून काही ठिकाणी काँक्रीट तर काही ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवल्याचे दिसून आले. काही गावात नदीच्या पत्रामध्ये मंदिर व सार्वजनिक शौचालय असल्याचेही दिसून आले. 


Forests of River Basin

River Basin Agricultural Practices and Allied Business

महांकाली नदीचे खोरे हे कवठेमंकाळ आणि जत या दोन तालुक्यानी बनलेले असून या नदी खोऱ्यामध्ये पीक पद्धतीमध्ये वेगवेगळेपणा दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने कवठेमंकाळ, आणि जत ही 3 दुष्काळ सदृश्य असणारी तालुके असून या तालुक्यांमध्ये कमी पाण्यावर येणारी पिका जास्त प्रमाणात घेतली जातात. प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर आधारित किंवा पावसाळा संपल्यानंतर एखादा दुसरे पाणी देता येईल अशा स्वरूपाची पिके या दोन्ही तालुक्यांमध्ये घेतली जातात.

    एकंदरीत महांकाली नदी खोऱ्यातील पीक पद्धतीचा विचार केला असता यामध्ये ज्वारी, बाजरी, मका यांसारखी तृणधान्य तर तूर, उडीद, मूग, मटकी यांसारखी कडधान्य तसेच भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ इत्यादी प्रकारची गळितधान्य या सोबतच ऊस, कापूस तसेच सर्व प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन ज्यामध्ये मिरची, टोमॅटो, वांगी, काकडी, दोडका, ढोबळी मिरची, पडवळ, कारले, डांगर भोपळा, या फळ भाज्या तसेच मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक, तांदूळजा, करडा, माठ, चिघळ यांसारख्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात.

    आपण जर या महांकाली नदी खोऱ्यातील फळ पिकाचे क्षेत्र पाहिले असता यामध्ये द्राक्ष आणि डाळिंब या दोन पिकावर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी लागवड केल्याचे दिसून येते. सोबतच आंबा, चिकू, पेरू, सिताफळ, बोर, नारळ, केळी, ड्रॅगन फ्रुट, पपई, चिंच अशा फळ पिकांची लागवड शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये केलेली आहे. या दोन वर्षांमध्ये चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कॅश क्रॉप घेण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास आले. तसेच या नदी खोऱ्यात दुग्ध व्यवसायात मोठया प्रमाणात वाड झाल्याने या भागात चारा पिकांची (मक्का, लसूण घास, मेथी घास, शाळवाची हूंडी) लागवड मोट्या प्रमाणात झालेली दिसून आली. शेतकऱ्यानी हिरव्या चाऱ्यासाटी मक्का पिकपासून मुरघास मोट्या प्रमाणात तयार केल्याचे दिसून आले. 

   एकंदरीत महांकाली नदी खोऱ्याच्या पीक पद्धतीचा आभ्यास केला आसत या खोऱ्यात तृणधान्य, कडधान्य, गलीतधान्य, फळभाज्या, पालेभाज्या, फळपिके, चारा पिके तसेच उस, कापूस या सारखी वार्षिक पिके शेतकरी घेत आसल्याचे निदर्शनास आले. 

Biodiversity of the River Basin

महांकाली नदी ही अग्रणी नदीची उपनदी असून सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ आणि जत तालुक्या मधून वाहत जाऊन कार्नाटकातील अथणी तालुक्यात अग्रणी नदीला मिळते. या नदीच्या पात्रात आणी दोन्ही बाजुच्या काठांवरपाण्याच्या उपलबद्धतेनुसार वजैवविविधते मध्ये विविधता दिसून येते.

हि जैवविविधता कुळांनुसार विभागली जाते-


1) मासे:- या मध्ये काटला, रोहू, नकटा, म्रीगल, बास, शींधी, कुरळ, अश्या साधारण 19 प्रजाती आढळून येतात.

2) उभयचर:- 11 प्रजातींचे उभयचर म्हणजे बेडूक प्रजाती येथे आढळून येतात.

3) सरपटणारे प्राणी:- या मध्ये सर्प प्रजाती जसे नाग, घोणस, मण्यार, फुरसे, धामण, कवड्या, रुका सर्प, नानेटी, पानदिवड , कासव यांच्या सोबत २०१९ च्या महापुरात कवठेमहांकाळ तालुक्यातील विठूरायाची वाडी या गावात मगर या संरक्षित प्रजातीचा वावर सुद्धा दिसून आला आहे.

4) पक्षी:-अग्रणी नदी खोर्यातील स्थानिक आणि स्थलांतरीत अश्या विविध पक्ष्यांच्या 190 पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. या मध्ये ब्राम्हणी घार, छोटा बगळा, बुलबुल, मोर यांसारख्या सामान्य पक्षी प्रजातींनसोबत तुतवार, हिरवी तुतारी, धाविक, वन घुबड, जांभळा बगळा, निलपरी, निळा माशिमार, रंगीत पानलावा, तीरचिमनी, अशा दुर्मिळ आणि काही स्थलांतरित पक्षी प्रजाती आढळून येतात. कवठेमहांकाळ तालुक्यातील नंगोळे गावात 4 वर्ष माळढोक पक्षी वास्तवास होता.

5) सस्तन प्राणी:-सस्तन प्राण्यांच्या एकूण 23 प्रजाती आढळून येतात. या मध्ये दुर्मिळ असलेल्या भारतीय लांडगा, खोकड, खवल्या मांजर, 5 पाट्यांची खार, मांज्याट यांसारख्या वन्य प्राण्या सोबत शेळ्या, मेंढ्या, म्हशी, गायी, यांच्या काही प्रजाती आढळून येतात.

कीटक, भुंगे, फुलपाखरे, मुंग्या, पतंग, माश्या, मधमाशी, यांसारख्या कीटकांच्या आणि कोळी, विंचू, खेकडे, गोचीड यांसारख्या अष्टपाद जीवांच्या कित्तेक प्रजाती आढळून येतत.

श्री.अमोल जाधव, वन्यजीव अभ्यासक

नेचर कॉन्झर्वेशन सोसाटी, सांगली (NACONS)

     9921034555

People's Recommendation for River Basin Rejuvenation

गावाचे नाव :- कोकळे

नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..

नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..

 

समस्या

उपाययोजना

1 . महांकाली नदी पात्रात कोकळे गावाच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर काटेरी बाभळी व पाणकणीस या गवताची वाढ झाले आहे.

नदीची साफसफाई करणे गरजेचे आहे.

नदीच्या पत्रामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विहिरी खोदल्या आहेत आणि त्यातून निघालेला राडारोडा (गाळ, माती, दगड) नदीपात्रात टाकले असल्याने नदी पात्राची साठवण क्षमता कमी झाली आहे.

महांकाली नदीचे पात्र अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असून यासाठी नदीचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे.

गावाच्या पाणीपुरवठा विहिरीजवळ शासनाने 2022 या वर्षी बांधलेल्या नवीन केटीवेअर मध्ये पाणी साठत नाही

शासनाने नवीन बांधलेल्या केटीवेअर बंधाऱ्याला गेट टाकले आहेत, परंतु त्याला रबरी पॅकिंग बसवली नसल्याने त्यातून पाणी लिकेज होऊन जात आहे. रबरी पॅकिंग बसवून नंतर गेट बसवावे लागतील.

गावातून निघणारे सर्व सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीपात्रात जात आहे.

ग्रामपंचायत च्या माध्यमातून या पाण्यावर प्रक्रिया करून असे पाणी शेतीसाठी वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावे.

गावाच्या शेजारी असणारा अग्रणी माऊली बंधाऱ्यांमध्ये गावातील महिला कपडे धुत आहेत त्यामुळे पाण्यामध्ये प्रदूषण वाढत आहे.

बंधाऱ्याच्या बाजूला महिलांसाठी धोबी घाट बांधून दिला पाहिजे. त्या धोबी घाटाचे पाणी शोष खड्डा करून त्यात मुरवल्यास हे प्रदूषण कमी होईल.

गावातून निघालेला बांधकामाचा कचरा डायरेक्ट नदीपात्रात डंप केला आहे. त्यामुळे नदीची वाहन क्षमता कमी झाली आहे.

तो नदीपात्रात टाकलेला कचरा तात्काळ उचलून नदीच्या काठावरती मोठे बांध घालणे आवश्यक आहे.

 

 

 

 

 

 

गावाचे नाव :- बसप्पाची वाडी

नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..

नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..

 

समस्या

उपाययोजना

महांकाली नदी वरील अग्रणी विठ्ठल बंधाऱ्याच्या पात्रामध्ये शेतकऱ्यांनी शेतीचे अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात या बंधाऱ्याची पाणी साठवून क्षमता कमी केले आहे.

महसूल विभागाने संबंधित शेतकऱ्याला समज देऊन ते अतिक्रमण तात्काळ काढून घेतले पाहिजे. अन्यथा एका शेतकऱ्याचे पाहून ईतर शेतकऱ्यांनी आसे अतिक्रमण केल्यास नदीचे पात्र अजिबात शिल्लक राहणार नाही.

नदीच्या पत्रामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विहिरी खोदल्या आहेत आणि त्यातून निघालेला राडारोडा (गाळ, माती, दगड) नदीपात्रात टाकले असल्याने नदी पात्राची साठवण क्षमता कमी झाली आहे.

महांकाली नदीचे पात्र अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असून यासाठी नदीचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे.

गावातून निघणारे सर्व सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीपात्रात जात आहे.

ग्रामपंचायत च्या माध्यमातून या पाण्यावर प्रक्रिया करून असे पाणी शेतीसाठी वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावे.

गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे.

महांकाली नदीवर गावाच्या बाजूला एक सिमेंट बंधारा अपेक्षित आहे. तसेच जल जीवन मिशनचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.

 

 

 

 

गावाचे नाव :- कुडन्नूर  

नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..

नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..

 

समस्या

उपाययोजना

गावातील विहिरींचे आणि बोरवेलचे पाणी अत्यंत क्षारयुक्त आहे त्यामुळे ते विनायोग्य तर नाहीच नाही तर ते अंघोळीच्या वापरासाठीही वापरता येत नाही ही मोठी समस्या आहे.

क्षारयुक्त पाणी कमी करण्यासाठी योग्य ती उपाययोजना शासनाने तात्काळ आमच्या गावात राबवावी.

गावातील ओढे व बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे त्यामुळे बंधाऱ्यांची साठवण क्षमता कमी झाली आहे.

गाव साठलेल्या बंधाऱ्यातील व ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करणे गरजेचे आहे.

गावात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या आहे. (गावातील पाणी क्षारयुक्त असल्यामुळे.)

कुडन्नुर येथे असणाऱ्या पाझर तलावामध्ये जर ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खोदली तर हा प्रश्न मार्गी लागणार आहे कारण तेथील पाणी क्षारयुक्त नसून गोडे आहे.

खांडेकर वस्ती पासून निघणाऱ्या ओढ्यावर असणाऱ्या सहा बंधाऱ्यांमध्ये साठला आहे.

या ओढ्याचे खोलीकरण रुंदीकरण करणे गरजेचे आहे. जेणेकरून तो गाळ शेतकरी घेऊन जातील. ओढ्याची साठवण क्षमता ही वाढेल आणि शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक होतील.

महांकाली नदीवर गावाच्या हद्दीमध्ये चौगुले वस्ती जवळ 2022 यावर्षी शासनाकडून एक गेटेड बंधारा तयार केला आहे परंतु त्या बंधार्‍यामध्ये गेट टाकले नसल्याने अजीबात पाणी साठत नाही.

संबंधित विभागाने कार्यवाही करून तात्काळ यामध्ये गेट टाकल्यास वाहणारे पाणी आडेल व उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना पाणी समस्या जाणवणार नाही.

 

 

 

 

 

गावाचे नाव :- डफळापुर   

नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..

नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..

 

समस्या

उपाययोजना

डफळापूर येथील रामकाठी पाझर तलाव याचे पात्र खूप उथळ झाले आहे.

पाझर तलावात असणारा गाव व मुरूम काढून तो तलाव खोल केल्यास त्याची पाणी साठवून क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल.

रामाठी ओड्यावर असणारे दगडी बंधारे नादुरुस्त असल्याने त्यामध्ये पाणी साठत नाही. बंधारे लिकेज आहेत.

या बंधाऱ्याला दोन्ही बाजूने सिमेंट काँक्रीटची भिंत केल्यास यामध्ये पाणी साठी व पाणी लिकेज होणार नाही.

सदाशिव शांत यांच्या शेताजवळ असणारा मातीनाला बांध लिकेज आहे त्यामुळे पाणी साठत नाही.

या तलावाचे लिकेज काढले पाहिजे

डफळापुर तलावात येऊन मिळणाऱ्या ओढ्याचे पात्र अरुंद झाले आहेत त्यामुळे त्याची वाहन क्षमता कमी झाली आहे.

डफळापुर तलावाला येऊन मिळणाऱ्या वड्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.

काळे शिवार येथे साहेबराव चव्हाण यांच्या वस्तीजवळ असणारा दगडी बंदरा लिकेज आहे.

हा बंधारा तात्काळ लिकेज काढला पाहिजे.

कुंभार तलाव व कापूर ओढा अशा दोन्ही ओढापत्रात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे.

ओढ्याचे खोलीकरण रुंदीकरण करून उड्या पात्रातील गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेता वरती पसरवला पाहिजे. जेणेकरून ओढा पत्राची वहन व साठवण क्षमता वाढेल व निघालेला गळा शेतकऱ्यांच्या जमिनीवर पसरल्यामुळे जमिनी सुपीक होतील.

भोकरचौंडी तलावात गाळ साठला आहे.

भोकरचौंडी तलावातील गाळ काढून तलावाची साठवण क्षमता वाढवली पाहिजे.

म्हैसाळ योजनेचे पाणी कितीही लवकर मागणी केली तरी आम्हाला वेळेवर मिळत नाही त्यामुळे आमचे पीक वाळवून गेल्यानंतर पाणी आल्यास त्याचा आम्हाला काहीही फायदा होत नाही.

आपल्या गावाला वेळेवर पाणी मिळण्यासाठी ग्रामस्थांनी फॉर्म नंबर 7 हा फॉर्म लवकरात लवकर भरून द्यावा हा फॉर्म पाणी मागणीचा आहे.

गावा शेजारी असणाऱ्या ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गावातील सांडपाणी जाते तसेच गावातून निघालेला कचरा संपूर्ण ओढ्याच्या पात्रावर टाकल्याचे दिसून आले.

गावातून निघणारे सांडपाणी प्रक्रिया करून शेतीसाठी वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावे. तसेच गावातील घन कचऱ्या ची योग्य ती विल्हेवाट लावावी.

 

 

 

 

गावाचे नाव :- कर्लहट्टी   

नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..

नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..

 

समस्या

उपाययोजना

गावाच्या हद्दीमध्ये महांकाली नदीवर ब्रिटिशकालीन गेटेड बंधारा आहे, तो बंधारा संपूर्ण गाळाणे भरला आहे.

महांकाली नदीवर असणाऱ्या या बंधाऱ्यातील पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करणे गरजेचे आहे.

गावातील ओढ्यावर असणारे तीन बंधारे नादुरुस्त असल्याने त्यामधे पाणी साठत नाही.

या बंधाऱ्याच्या तळातून दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रीट ची एक फुटाची भिंत घेऊन या बंधाऱ्याला जॅकेटिंग केल्यास हे सर्व बंधारे पुनर्जीवित होतील.

महांकाली नदीपात्रावर गावाच्या हद्दीमध्ये पाणी साठत नाही.

नदी वरती सिमेंट बंधारे होणे गरजेचे आहे.

 

 

 

 

 

गावाचे नाव :- शिंगणापुर

नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..

नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..

 

समस्या

उपाययोजना

महांकाली नदीवर एक जुना केटीवेअर बंधारा आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून बंधार्‍याला गेट नसल्यामुळे या बंधार्‍यात अजिबात पाणी थांबत नाही.

संबंधित शासकीय यंत्रणेने तात्काळ कार्यवाही करून याला गेट बसवणे गरजेचे आहे. बंधारा खूप मोठा आहे मोठ्या प्रमाणात पाणी साठवन क्षमता होणार आहे.

गावातील पाझर तलावामध्ये गावासाठी आहे त्यामुळे तलावाची साठवण क्षमता कमी झाली आहे.

या तलावातील गाळ तात्काळ काढून तो गाव शेतकऱ्यांच्या जमिनीवर पसरवला पाहिजे.

महांकाली नदीवर असणारा सिमेंट बंधाऱ्यांमध्ये गाळ साठला आहे.

महांकाली नदीचे पात्र खोलीकरण व रुंदीकरण करणे गरजेचे आहे.

जिरग्याळ गावाकडून येणाऱ्या ओढ्यावर गावाच्या हद्दीमध्ये असणारे दोन्ही बंधारे नादुरुस्त आहेत. त्या मध्ये अजिबात पाणी थांबत नाही.

या बंधाऱ्यांची तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

गावातील पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे कारण हे पाणी क्षारयुक्त आहे.

पाण्यातील क्षार कमी करण्यासाठी जे काही उपाय योजना असतील त्या उपाययोजना गावात राबवणे गरजेचे आहे.

गावातील पाणी पातळी वाढण्यासाठी पुढील उपाययोजना करा.

रामाप्पा पांढरे यांच्या वस्तीजवळ एक मातीनाला बांध नवीन तयार करता येतो. तसेच महांकाली नदीवर पाणी अडवण्यासाठी सिमेंट बंधारे होणे गरजेचे आहे‌ ओढा पात्रांमध्ये व तलावा मध्ये रिचार्ज शाफ्ट होणे गरजेचे आहे.

 

 

Best Practices Followed in River Basin Rejuvenation

   अग्रणी नदीला अविरल, निर्मल आणि बारमाही वाहण्यासाठी सांगली प्रशासन आणि जल बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2013 साली जागतिक जलतज्ञ जलपुरुष डॉ.राजेंद्रसिंहजी यांच्या मार्गदर्शनाखाली "अग्रणी नदी खोरे पुनरुज्जीवन प्रकल्पाची" स्थापना करण्यात आली. या प्रकल्पाच्या अंतर्गत नदीला बारमाही वाहती करण्यासाठी कोणकोणती जलसंधारणाची कामे करणे आवश्यक आहे, या गोष्टीचा अभ्यास करून एक डी.पी.आर. तयार करण्यात आला. त्या डी.पी.आर मध्ये पुढील पाच वर्षाचे नियोजन करून कामाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने जल बिरादरी या संस्थेचा सिंहाचा वाटा आहे कारण या संस्थेने अग्रणी नदी खोऱ्यातील गावांमध्ये वेग वेगळ्या प्रकारची जलसंधारणाची कामे उभारून गावाला जल समृद्ध करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अग्रणी नदी खोऱ्यांमध्ये जल बिरादरीच्या माध्यमातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाचा आढावा:-

१.     सिमेंट बंधारे:- २१ ( ३५ ते ७५ मीटर रुंदीचे )

         सन 2013 सली जेव्हा अग्रणी नदीचा अभ्यास करण्यात आला त्यावेळेस असे निदर्शनास आले की अग्रणी नदीचे ऐणवाडी गावातील उगमस्थान हे समुद्रसपाटीपासून 780 मीटर उंचीवर असून नदीच्या प्रवाहाने खाली आल्यास करंजे गावाजवळ याची उंची 560 मीटर होते. म्हणजेच 20 किमी च्या अंतरावर 200 मिटरचा उतार आहे. यातुन नदीला खूप तीव्र उतार आहे असे निदर्शनास आले या नदीला उगमापासून ते संगमापर्यंत फक्त सात केटीवेअर बंधारे तासगाव आणि कवठेमंकाळ या दोन तालुक्यात होते. परंतु त्याही बंधाऱ्यांना गेट नसल्यामुळे त्यामध्ये पाणी साठत नव्हते.

    खाणापुर तालुक्यातील करंजे ते ऐनवाडी या वीस किलोमीटरच्या भागात एकही बंधारा नसल्याचे निदर्शनास आल्याने जल बिरादरीच्या माध्यमातून लोकसहभागातून फेब्रुवारी 2013 मध्ये बलवडी गावाच्या गायकवाड मळ्या मध्ये लोकसहभागातून बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. 25 मीटर लांबीचा सिमेंट बंधारा 3 महिन्यांमध्ये या नदीवर उभारण्यात आला. यामध्ये लोकांनी सिमेंट, खडी, वाळू, स्टील, लेबर, बांधकामाला लागणारे पाणी अशा स्वरूपाची मदत एकत्र करून या बंधाऱ्याची उभारणी केली. 6 लाख 25 हजार रुपयांचा खर्च या बंधार्‍यास आला. अग्रणी नदीवरील सर्वात पहिला बंदरा म्हणून या बंधार्‍याची नोंद आहे. 2014 साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांनी या बंधाऱ्याला भेट देऊन लोकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. यानंतर सन 2013 ते 2023 या दहा वर्षाच्या काळात अग्रणी नदीवर जल बिरादरीच्या माध्यमातून केवळ लोकसहभागातून 11 बंधारे अग्रणी नदीच्या प्रमुख उपनदी महांकाली नदीवर 05 बंधारे तर नदीला येऊन मिळणार्या ओढ्यांवर 05 असे एकूण 21 बंधारे उभारण्यात आले.

 यामध्ये प्रामुख्याने महांकाली नदीवर 75 मीटर रुंदीचा सिमेंट बंधारा उभारण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये एवढ्या लांबीचा सिमेंट बंधारा हा कोठेच नाही तो फक्त महांकाली नदीवर लोक सहभागातून उभारण्यात आलेला आहे. जल बिरादरी च्या माध्यमातून नदीवर बांधलेले बंधारे लोकांनी समोर उभारून करून घेतलेल्या कामांमुळे एकदम चांगल्या क्वालिटीचे तयार झाले आहेत. वरील 21 बंधाऱ्यातून एक थेंबही पाणी लिकेज होत नाही.


१.     वन जमिनी वरील खोल सलग समतल चर ( डिप सी.सी.टी. ) : ३१६ हेक्टर.

    अग्रणी नदी खोऱ्याचा अभ्यास करत असताना अग्रणी नदी खोऱ्यामध्ये असणाऱ्या 107 गावांपैकी 45 गावांमध्ये वन जमीन असल्याचे आढळून आले. या वन जमिनीची पाहणी केली असता यावर डीप सीसीटी व मातीनाला बांध तसेच वन तळे यांसारख्या स्वरूपाची जलसंधारणाची कामे केल्यास आपण नदी खोऱ्यातील गावांना जल समृद्ध बनवू शकतो या उद्देशाने जल बिरादरीच्या माध्यमातून अग्रणी नदी खोऱ्यातील वन जमीन आसनार्या 45 गावांपैकी ऐनवाडी २५ हे. बलवडी २५ हे. सिध्देवाडी २५ हे. सावळज २५ हे. डोंगरसोनी ६० हे. खलाटी ४८ हे.  रांजणी ८ हे . नांगोळे २५ हे. डफळापुर २५ हे. कुकटोळी ५० हे. 11 गावांमध्ये मिळून 316 हेक्टर वन जमिनीवर डीप सीसीटी (सलग समतल चर) खोदण्याचे काम केले आहे. यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. यामध्ये त्यांचे विहीर, बोरवेल रिचार्ज होऊन पाणी पातळी मध्ये मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आले.


३. नदी/ओढा/ नाला खोलीकरण व रुंदीकरण:- ५१ किमी.

   जलपुरुष डॉ.राजेंद्रसिंहजी यांच्या सिद्धांतानुसार नदीला पुनर्जीवित करायचे असेल तर, नदीला येऊन मिळणारे नाले ओढे यां मधील गाळ काढून त्यावर जलसंधारणाची करावी जो पर्यंत नदीला येऊन मिळणारे छोटे मोठे ओढे नाले पुनरुज्जीवीत होत नाहीत तो पर्यंत नदी पुनरूज्जीत होणार नाही याच उद्देशाने अग्रणी नदी खोऱ्यातील कोकळे महांकाली नदी १० कि.मी,  सावळज ४ ओढे ६ कि.मी,  वज्रचडे ओढा ३ कि.मी,  गव्हाण ओढा ७ कि. मी, पिराची ओघळ ४ कि.मी,  खलाटी ओढा ३ कि.मी. बेलदार ओघळ २ कि.मी. नांगोळे ओढा ७ कि.मी,  काळा ओढा & रामपुरवाडी ओढा ५ किमी या ओढ्यांचे मिळून तब्बल 51 किलोमीटर खोलीकरण रुंदीकरणाचे काम केवळ आणि केवळ लोकसहभागातून करण्यात आले आहे.

  या सर्व ओढ्याचे खोलीकरण रुंदीकरण करत असताना ओढापत्रातून निघालेला गाळ शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवर पसरवण्यासाठी शेतकरी स्वतः वाहून घेऊन गेले आणि ज्या जमिनी लागवडी योग्य नव्हत्या त्या जमिनी हा गाळ टाकल्यामुळे लागवडी लायक बनल्या. गाळ निघाल्यामुळे एक तर पाणी साठ्या मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ झाली सोबतच आजूबाजूच्या पडीक जमिनी सुपीक बनल्या. खोलीकरण रूंदीकरण केलेल्या सर्व ठीकाणी नदी/ ओढ्याच्या दोन्ही काठावर बांबुची लागवड केली आहे.


४. झाडांची लागवड:-

    जल बिरादरीच्या माध्यमातून लोक सहभागातून वन जमिनीवर केलेल्या डीप सीसीटींवर मातीचे धूप होऊ नये तसेच पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरावे व वनजमिनीवर वनक्षेत्र तयार व्हावे या उद्देशाने स्थानिक देशी वृक्षांची लागवड केली आहे. त्या सोबतच खोलीकरण रुंदीकरण केलेल्या ओढे यांच्या काठावर मातीची धूप होऊन काठावर असलेला गाळ परत उन्हाळा पत्रात येऊ नये या भूमिकेतून ओढ्याच्या दोन्ही काठावर बांबुची लागवड केली आहे. शाळेची मुलं तसेच गावकरी यांच्याकडून वृक्षारोपण तर काही भागांमध्ये बियांचे टोकन केले आहे.


५. तलावातील गाळ काढणे:-

   अग्रणी नदी खोऱ्यातील खानापूर , तासगांव , कवठेमहांकाळ या तालुक्यातील जुने तलाव जे गाळाने पूर्ण भरले होते. ते गाळ मुक्त करण्यात आले. अशा जुन्या तलावातील गाळ काढल्याने तलावाची पाणी साठवणूक क्षमता वाढली त्यासोबतच तलावात पाणी मुरल्याने तेथील आजूबाजूच्या जमिनीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास आले. सोबतच जो गाळ या तलावातून काढलेला होता तो शेतकऱ्यांनी आपल्या पडीक जमिनीवर पसरवला त्यामुळे शेतकऱ्यांच्या पडीक असणाऱ्या जमिनी लागवडीखाली आल्या.


६. वन जमिनीवरील डोंगर उताऱ्यावर माती नालाबांध तयार करणे:- २७७.

अग्रणी नदी खोऱ्यातील डोंगरसोनी ९, खलाटी ३५, बलवडी ८, रांजणी ६, नांगोळे १९, डफळापुर १६२, कुकटोळी ३८. या गावांमध्ये तीव्र डोंगर उतार आहे. अशा गावांमध्ये डोंगराच्या पायथ्याशी आयडियल साईट निवडून तेथे मातीनाला बांध तयार करून मोठा पाणीसाठा निर्माण करण्यात आला आहे. यामुळे डोंगर उतारावरून वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरूम पुढे ओढ्याला जात आहे. त्यामुळे आजूबाजूच्या विहिरींना व बोरवेल ला चांगला फायदा झाला आहे. सोबतच डोंगरावरील मातीची होणारी धूप ही थांबली आहे.


७.केशरआंबारोपेवाटप:- (43 हजार)  

   अग्रणी नदी खोऱ्यातील खानापूर, तासगाव, कवठे मंहाकाळ, मिरज आणि जत हे पाच तालुक्यांना दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जात होता. या भागामध्ये उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होत असे. त्यामुळे लोकांच्या फळबागांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या दृष्टीने विचार करत असताना येथील जमीन व हवामान केशर आंब्याच्या रोपासाठी पोषक असल्याचे आढळले. त्यामुळे जल बिरादरीने अग्रणी नदी खोऱ्यातील शेतकऱ्यांना केशर आंब्याच्या रोपाचे वाटप करण्याचे ठरविले. एका शेतकऱ्याला दोन ते पाच अशी रोपे देण्यात आली. पाच पेक्षा जास्त एकही शेतकऱ्याला रोपे दिली नाहीत कारण दिलेली शेतकऱ्यांनी आपापल्या बांधा वरती लावून त्याला पाणी घालावे व जगवावे हा दृष्टिकोन समोर ठेवून आजपर्यंत अग्रणी नदी खोऱ्यातील पाच तालुक्यांमध्ये 43 हजार केशर अंबा रोपांचे वाटप केले आहे. 


blog

Pune

Pollution in Indrayani River

The Indrayani River, originating near Lonavala in Maharashtra, holds significant religious and ecological importance. However, it faces severe pollution due to untreated domestic sewage, industrial effluents, and religious activities in towns like Alandi and Talegaon.

blog

pune

Pollution in Bhima River

The Bhima River, a major tributary of the Krishna River, faces significant pollution due to untreated industrial effluents, agricultural runoff, and domestic sewage. Rapid urbanization and industrialization along its banks have further exacerbated the problem, particularly in the Pune and Solapur districts.

blog

Nashik

Water Scarcity and Over-Extraction

The Godavari River is facing water scarcity due to over-extraction for agriculture, industrial use, and growing urban demand. Large-scale irrigation projects, unregulated borewell drilling, and inefficient water management exacerbate the issue.

© 2025, Jal Biradari