Background

Adila Nadi

Home / River

Adila Nadi

In Solapur District

River Length: 47 Km


 Origin Location: Dhanegaon osamanabad


 Confluence Location: Talgaon Solapur

 

 Name and Contact of The Coordinator: 

Dr. Anil Narayanpethkar 9423325587

Pravin Tale 9923899698

Introduction of River

अदिला नदी ही सीना नदीची उपनदी आहे.

अदिला नदीचा उगम धनेगाव जिल्हा उस्मानाबाद येथे होतो. 

GPS Latitude- 17.949920°, Longitude-76.054649°(Decimals,Degree) (Dhanegoan-Sangvi mardi Village)

अदिला नदीची लांबी 47.42 किमी आहे.

महाराष्टात अदिला नदीचे खोरे उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात आहे.

उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील 80 गांवे अदिला नदीखोऱ्यात आहेत.

अदिला नदी खोऱ्याचे एकुण क्षेत्रफळ 72424 हेक्टर आहे.

अदिला नदीचा संगम हा तेलगाव जिल्हा सोलापूर येथे भीमा नदीशी होतो.

GPS - Latitude- 17.589696°, Longitude:- 75.813571°(Decimals,Degree) (Telgoan village)


नदीपात्र लगतची गावे:-

1. माळूम्ब्रा, 2. सांगवी कटी, 3. सांगावी मगर, 4. सुरतागाव, 5. तामलवाडी, 6. होनसळ, 7. राळेरास, 8. तरटगाव, 9. एकरुख, 10, देगाव, 11.बेलाटी, 12. कवठे, 13. देण्गाव, 14. तेलगाव.

River Samvaad Yatra








River Basin Villages and Related Maps

सोलापूर जिल्हा नकाशा.

 

अदिला पाणलोटक्षेत्रातील गावे दर्शवनारा नकाशा.


सोलापूर जिल्ह्यातील नद्या दर्शवणारा नकाशा.



Encroachment on River Lands

1.   विहिरींचे अतिक्रमण:-

         नदीच्या काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांनी नदीपात्रात विहीर घेऊन त्या विहिरीला सिमेंट काँक्रीटचे कडे तयार केले असून त्या विहिरीतून निघालेला सर्व दगड, गाळ, माती हा राडाराडा नदीच्या पात्रातच टाकलेला आहे. त्यामुळे नदीची वाहन क्षमता खूपच कमी झाल्याचे दिसून आले. नदीपात्रात जवळपास बराच भाग विहरींच्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला आहे. आजूबाजूच्या व गावातील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली असता लोकांनी शेतकऱ्यांनी नदीच्या काठावर किंवा पात्रामध्ये विहिरी घेतल्या असेल तर विहिरी असू द्याव्यात परंतु विहिरीतून निघालेला गाळ, माती, कचरा इत्यादी राडाराडा शेतकऱ्याने तात्काळ बाजूला करावा आसे मत मांडले.


2.   शेतीचे अतिक्रमण:-

अदिला नदीची यात्रा करत असताना प्रामुख्याने नदीपात्रात शेत जमिनीचे अतिक्रमण झाल्याचे आढळले. कारण काय तर ही नदी बारमाही वाहत नसल्याने ज्यावेळेस नदीपात्रात पाणी नसते त्यावेळेस शेतकरी आपला बांध नदीपात्रात सरकवतात आणि डायरेक्ट पीक नदीपात्रात घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्याचा वैयक्तिक फायदा होतो आहे. परंतु नदीची पाणी वाहन क्षमता व पाणी साठवण क्षमता कमी झाल्याचे दिसून आले.


3.   बांधकामांचे अतिक्रमण:-

   नदीच्या काठावर असणाऱ्या प्रत्येक गावातील स्मशानभूमी नदीपात्रात असल्याचे आढळले.  स्मशानभूमी नदीपात्रात आहेच सोबतच लोकांना तेथे उभे राहता यावे यासाठी नदीपात्रांमध्ये भराव टाकून काही ठिकाणी काँक्रीट तर काही ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवल्याचे दिसून आले. काही गावात नदीच्या पात्रामध्ये मंदिर व सार्वजनिक शौचालय असल्याचेही दिसून आले. तसेच नदीवर बांधलेले पूल यांची रुंदी नदीच्या रुंदी पेक्षा कमी ठेवल्याने नदी प्रवहास अडथळा निर्माण झाला आहे. 

Forests of River Basin

सोलापूर जिल्ह्यातील एकुण वन जमीन 377.75 चौ.की.मी.

एकुण क्षेत्रफळाशी वन जमीनीची टक्केवारी 02.54%

River Basin Agricultural Practices and Allied Business

हा जिल्हा कमी पावसाच्या, पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. येथे पावसाचे वार्षिक सरासरी प्रमाण ५०० ते ७५० मि. मी. (५० ते ७५ से.मी.) इतके कमी आहे. तसेच पावसाची विभागणीही असमान आहे तरी उजनी धरणामुळे येथील बागायत क्षेत्र १८ ते २०% आहे. यावर प्रामुख्याने ऊस हे पीक घेतले जाते. एकूण ७५ ते ८२ % शेती लहरी पावसावर अवलंबून आहे. सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठारच म्हटले जाते. रब्बी मोसमातल्या ज्वारीखालील क्षेत्र सुमारे ७ लाख हेक्टर आहे. ज्वारी ह एक धान्यप्रकार आहे. हे एक तृणधान्य आहे. यास जोंधळा असेही म्हणतात. या वनस्पतीला इंग्रजीत Great millet असे म्हणतात. खरीप ज्वारीचे क्षेत्र सुमारे १५०० हेक्टर आहे. ज्वारीची मालदांडी ३५-१ ही जात प्रसिद्ध आहे. १९९० मध्ये आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या फळबाग रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीमुळे सोलापूर जिल्ह्यात फळबाग क्षेत्रात क्रांती झाली. डाळिंब (सुमारे ३० हजार हेक्टर), बोर (सुमारे २० हजार हेक्टर) या पिकांसह आंबा (९ हजार हेक्टर), सीताफळआवळाजांभूळ यांच्या फळबागा कमी पाऊस असूनही केवळ विशिष्ट हवामानामुळे जिल्ह्यात वाढत आहेत. तसे फळ-प्रक्रिया उद्योगाबद्दलही आकर्षण वाढते आहे. द्राक्षाचीही लागवड जिल्ह्यात अधिकाधिक होत आहे. मोहोळपंढरपूर इ. तालुक्यांत द्राक्षापासून बेदाणेही तयार केले जातात. सांगोला व पंढरपूर तालुक्यांमध्ये बोर, डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. सोलापूर जिल्ह्यात मुळेगाव येथे (१९३३ साली पुण्याहून येथे आणण्यात आलेले) कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे. तसेच जिल्ह्यात रब्बी ज्वारी संशोधन केंद्र व डाळिंब संशोधन केंद्रही आहे. सोलापूर जिल्ह्यातील कृषितज्ज्ञ व कृषि-अधिकारी श्री.वि. ग. राऊळ यांनी प्रामुख्याने फळबाग क्षेत्रात केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात क्रांती घडवून आणली. डाळींबबोर तसेच सूर्यफूलकरडई या पिकांबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना संघटितही केले. सांगोल्याची डाळींब युरोपीय देशात पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. उत्तर भारत आणि महाराष्ट्रात असलेल्या हवामान बदलामुळे दरवर्षी चांगला दर मिळणाऱ्या डाळिंबाला सध्या कवडीमोल किमतीने विकण्याची वेळ डाळिंब उत्पादक शेतकऱ्यावर अली आहे. पण सांगोला तालुक्यातील एका तरुणाने मात्र या सगळ्यावर मात करत आपल्या बागेतील डाळिंब थेट युरोपीय देशात पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यामधील तालुका उत्तर सोलापूर मध्ये रानमसले साधारण ५००० लोक संख्या असणारे एक गाव आहे. या गावाचे वैशिष्ट असे आहे कि या गावात कांदा खूप पिकवला जातो. सोलापूर, मुंबई हैद्राबाद बंगलोर या ठिकाणी कांदा विकण्यासाठी जातो.बार्शी तालुक्यात नारी, नारीवाडी ही गावे द्राक्षे फळ पिकासाठी प्रसिद्ध आहेत.

blog

Pune

Pollution in Indrayani River

The Indrayani River, originating near Lonavala in Maharashtra, holds significant religious and ecological importance. However, it faces severe pollution due to untreated domestic sewage, industrial effluents, and religious activities in towns like Alandi and Talegaon.

blog

pune

Pollution in Bhima River

The Bhima River, a major tributary of the Krishna River, faces significant pollution due to untreated industrial effluents, agricultural runoff, and domestic sewage. Rapid urbanization and industrialization along its banks have further exacerbated the problem, particularly in the Pune and Solapur districts.

blog

Nashik

Water Scarcity and Over-Extraction

The Godavari River is facing water scarcity due to over-extraction for agriculture, industrial use, and growing urban demand. Large-scale irrigation projects, unregulated borewell drilling, and inefficient water management exacerbate the issue.

© 2025, Jal Biradari